ब्लूमबर्ग नव-अर्थव्यवस्था मंचाच्या 17 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या तिसऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 17th, 06:42 pm
मायकल आणि ब्लूमबर्ग सेवाप्रतिष्ठानाचा चमू करत असलेल्या महत्वाच्या सामाजिक कार्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करतो. भारताच्या स्मार्ट सिटी अभियानाची रूपरेखा तयार करण्यात त्यांच्या चमूने केलेली मदत अत्यंत उपयुक्त ठरली.भारतात शहरीकरणात गुंतवणूकीसाठी उत्तम संधी असल्याचे सांगत पंतप्रधानांचे गुंतवणूकदारांना निमंत्रण
November 17th, 06:41 pm
मोदी म्हणाले की कोविड -19 नंतरच्या जगाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. मात्र पुनर्रचना केल्याशिवाय पुन्हा सुरुवात करणे शक्य नाही. मानसिकतेची पुनर्रचना, प्रक्रियांची पुनर्रचना आणि पद्धतींची पुनर्रचना. महामारीने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी दिली आहे. “जर आपल्याला भविष्यासाठी लवचिक प्रणाली विकसित करायची असेल तर ही संधी जगाने साधायला हवी. जगाच्या कोविडनंतरच्या गरजांविषयी आपण विचार केला पाहिजे. आपल्या शहरी केंद्रांचा कायाकल्प करणे ही एक चांगली सुरुवात असेल ”, असे पंतप्रधान म्हणाले.