मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

September 14th, 12:15 pm

बुंदेलखंडची ही धरती वीरांची धरती आहे, शूरवीरांची धरती आहे. या भूमीला बीना आणि बेतवा, दोन्हींचा आशीर्वाद मिळाला आहे. आणि मला तर एक महिन्यात दुसऱ्यांदा, सागरला येऊन आपणा सर्वांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आणि मी शिवराज जींच्या सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण आज इथे येऊन, आपणा सर्वांचे दर्शन घेण्याची संधी दिली. मागच्या वेळी मी संत रोहिदासजींच्या त्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना भेटायला आलो होतो. आज मला मध्य प्रदेशचा विकास आणि त्या विकासाला नवी गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळत आहे. हे प्रकल्प, या क्षेत्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देतील. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता, पन्नास हजार कोटी किती असतात? आपल्या देशातल्या अनेक राज्यांचा पर्ण वर्षाचा अर्थसंकल्प देखील इतका नसतो, जितका खर्च आज एकाच कार्यक्रमासाठी भारत सरकार करत आहे. यातून हे दिसून येते की मध्य प्रदेशसाठी आमचे संकल्प किती मोठे आहेत. हे सगळे प्रकल्प येणाऱ्या काळात मध्य प्रदेश मध्ये लाखो तरुणांना रोजगार देतील. हे प्रकल्प, गरीब आणि मध्यमवर्गातल्या कुटुंबांची स्वप्न सत्यात उतरवणारे आहेत. मी बीना रिफायनरीचे विस्तारीकरण आणि अनेक नव्या सुविधांच्या भूमिपूजनाच्या मध्य प्रदेशच्या कोट्यवधी जनतेला अनेक अनेक शुभेच्छा देतो.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी

September 14th, 11:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात बिना येथे 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बिना रिफायनरीमधील 49,000 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार होणारे पेट्रोकेमिकल संकुल, नर्मदापुरम येथे पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी झोन’, इंदूरमध्ये दोन आयटी पार्क आणि रतलाम येथे मेगा इंडस्ट्रियल पार्क आणि मध्य प्रदेशात सहा नवी औद्योगिक क्षेत्रे यांचा समावेश होता.