
गुजरातमधील नवसारी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
March 08th, 11:50 am
काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला. आणि आज, मला मातृशक्तीच्या या महान कुंभमेळ्यात आशीर्वाद मिळाला आहे. महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला आणि आजच्या या मातृशक्तीच्या महाकुंभात सर्व माता - भगिनींचा आशीर्वाद मिळाला. आजचा हा महिला दिन, गुजरातची माझी मातृभूमी आणि इतक्या मोठ्या संख्येने आपणा सर्व माता, भगिनी आणि मुलींची उपस्थिती, या खास दिवशी तुमचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल मी मस्तक झुकवून मातृशक्तीला वंदन करतो. गुजरातच्या या भूमीवरून मी सर्व देशवासीयांना, देशातील सर्व माता आणि भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आज येथे गुजरात सफल आणि गुजरात मैत्री या दोन योजनांचा शुभारंभ देखील झाला. अनेक योजनांचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले गेले आहेत. याबद्दलही मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील नवसारी येथे विकासकामांचा प्रारंभ
March 08th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता, भगिनी आणि मुलींच्या प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि या विशेष दिनानिमित्त देशातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महाकुंभ मेळ्यात आपण माँ गंगेचा आशीर्वाद प्राप्त केला तर आज मातृशक्तीच्या महाकुंभात माता भगिनींचे आशीर्वाद मिळवल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आज गुजरातमध्ये जी-सफल (G-SAFAL) (गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ऑगमेंटिंग लाईव्हलीहूड्स) आणि जी-मैत्री (G-MAITRI) (गुजरात मेंटॉरशिप अँड एक्सेलरेशन ऑफ इंडिव्हिजुअल्स फॉर इंडिव्हिजुअल्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग रुरल इन्कम) या दोन योजनांचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. विविध योजनांचा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आणि या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.
We launched the SVAMITVA Yojana to map houses and lands using drones, ensuring property ownership in villages: PM
January 18th, 06:04 pm
PM Modi distributed over 65 lakh property cards under the SVAMITVA Scheme to property owners across more than 50,000 villages in over 230 districts across 10 states and 2 Union Territories. Reflecting on the scheme's inception five years ago, he emphasised its mission to ensure rural residents receive their rightful property documents. He expressed that the government remains committed to realising Gram Swaraj at the grassroots level.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद
January 18th, 05:33 pm
मध्य प्रदेशातील सिहोर येथील स्वामित्व लाभार्थी मनोहर मेवाडा यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व योजनेविषयीचा त्यांचा अनुभव विचारला. मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे त्यांनी कशा प्रकारे कर्ज मिळवले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल झाला आहे, असे पंतप्रधानांनी मनोहर यांना विचारले. त्यावर आपल्या डेरी फार्मसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची आणि त्यामुळे आपला व्यवसाय सुरू करता आल्याची माहिती मनोहर यांनी दिली. आपली मुले आणि पत्नी देखील या डेरी फार्ममध्ये काम करत आहेत आणि यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे असे मनोहर यांनी सांगितले.मालमत्तेची कागदपत्रे असल्यामुळे बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे झाले असे मनोहर यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारी योजनांमुळे लोकांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामित्व योजनेमुळे लाखो कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक नागरिकाने त्याची मान अभिमानाने उंचवावी आणि त्याच्या जीवनात सुलभता अनुभवावी हे सुनिश्चित करण्याला सरकारचे प्राधान्य असल्यावर त्यांनी भर दिला. याच दृष्टीकोनाचा स्वामित्व योजना ही विस्तार असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे केले वितरण
January 18th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले. भारतामधील गावे आणि ग्रामीण भागांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले आणि सर्व लाभार्थी आणि नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड्स मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी स्वामित्व योजना सुरू करण्यात आली, असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांमध्ये मालमत्ता मालकी प्रमाणपत्रांना घरोनी, अधिकार अभिलेख, प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता पत्रक आणि आवासीय भूमी पत्ता यांसारख्या विविध नावांनी ओळखले जाते असे त्यांनी नमूद केले.Our government's intentions, policies and decisions are empowering rural India with new energy: PM
January 04th, 11:15 am
PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.PM Modi inaugurates the Grameen Bharat Mahotsav 2025
January 04th, 10:59 am
PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 23rd, 11:00 am
मी काल रात्री उशिरा कुवेतहून परत आलो आहे… तिथे मी भारतीय युवा आणि व्यावसायिकांची भेट घेतली आणि खूप गप्पा मारल्या. आता इथे आल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम देशातील युवा वर्गासोबत आयोजित केला आहे. हा अतिशय सुखद योगायोग आहे. आज देशातील हजारो युवांसाठी,आपणा सर्वांच्या आयुष्याची नवी सुरुवात होते आहे. तुमचे कित्येक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. 2024 हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नवीन आनंद देऊन जाते आहे. मी तुम्हा सर्व युवांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण
December 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.राजस्थानमध्ये जयपूर इथे ‘एक वर्ष –परिणाम उत्कर्ष’ कार्यक्रम आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
December 17th, 12:05 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सी. आर. पाटील, भगीरथ चौधरी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, प्रेम चंद भेरवा आणि अन्य मंत्री, खासदार, राजस्थानचे आमदार, मान्यवर व्यक्ती तसंच राजस्थानमधल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे 'एक वर्ष-परिणाम उत्कर्ष' या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी
December 17th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ' एक वर्ष-परिणाम उत्कर्ष':राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूने केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले . पहिल्या वर्षाने पुढील अनेक वर्षांच्या विकासासाठी एक भक्कम पाया म्हणून काम केले आहे , असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचेच दर्शन घडत नाही तर राजस्थानच्या तेजस्वी प्रकाशाचे आणि विकासाच्या उत्सवाचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अलीकडेच रायझिंग राजस्थान शिखर परिषद 2024 च्या वेळी दिलेल्या भेटीचे स्मरण करत यावेळी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते आणि आज 45,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या प्रकल्पांमुळे राजस्थानमधील पाण्याशी संबंधित समस्यांवर योग्य तोडगा निघेल आणि राजस्थान भारतातील परस्परांशी जोडलेल्या सर्वात चांगल्या राज्यांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकासकामांमुळे अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित होतील, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल तसेच राजस्थानमधील शेतकरी, महिला आणि तरुणांना फायदा होईल, असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.Our government has taken unprecedented steps for women empowerment in the last 10 years: PM in Panipat, Haryana
December 09th, 05:54 pm
PM Modi launched the ‘Bima Sakhi Yojana’ of Life Insurance Corporation, in line with his commitment to women empowerment and financial inclusion, in Panipat, Haryana. The Prime Minister stressed that it was imperative to ensure ample opportunities and remove every obstacle in their way to empower women. He added that when women were empowered, new doors of opportunities opened for the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला एलआयसीच्या बिमा सखी योजनेचा शुभारंभ
December 09th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन या त्यांच्या बांधिलकीला अनुसरून हरयाणात पानिपत येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बिमा सखी योजना या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी कर्नाल येथील महाराणा प्रताप फळबागायत विद्यापीठाच्या मुख्य संकुलाची देखील पायाभरणी केली.आज भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकत आहे, असे ते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की आज महिन्याचा 9 वा दिवस विशेष आहे कारण 9 हा आकडा आपल्या धर्मग्रंथात शुभ मानला गेला होता आणि नवरात्री दरम्यान पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गाच्या नऊ रूपांशी संबंधित होता. आजचा दिवस नारी शक्तीच्या उपासनेचाही आहे, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान 9 डिसेंबरला राजस्थान आणि हरियाणाच्या दौऱ्यावर
December 08th, 09:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर रोजी राजस्थान आणि हरियाणाला भेट देणार आहेत. ते प्रथम जयपूरला जाणार असून सकाळी 10:30 वाजता त्यांच्या हस्ते जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (JECC) येथे रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूकदार परिषद 2024 चे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान पानिपतला जाणार असून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते एलआयसीच्या विमा सखी योजनेचा प्रारंभ तसेच महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठाच्या मुख्य परिसराची पायाभरणी करणार आहेत.