पीएम-जनमन योजने अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 15th, 12:15 pm

जोहार, राम-राम। सध्या देशात उत्सवाचे वातावरण आहे. उत्तरायण, मकर संक्रांती, पोंगल, बिहू अशा अनेक सणांचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे हा उत्साह अधिकच दिमाखदार आणि चैतन्यमय झाला आहे, आणि तुमच्याशी बोलणे, ही माझ्यासाठी मोठी पर्वणी ठरली आहे. आज एकीकडे अयोध्येत दिवाळी साजरी होत आहे, तर दुसरीकडे माझे एक लाख वंचित आदिवासी बंधू-भगिनी, जे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, माझे हे आदिवासी कुटुंबीय, अती वंचित आदिवासी कुटुंब, त्यांच्या घरी दिवाळी साजरी होत आहे, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आज त्यांच्या बँक खात्यात पक्क्या घरासाठी पैसे जमा केले जात आहेत. या सर्व कुटुंबांचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. हे पुण्य कर्म करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता

January 15th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN)अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण) (PMAY - G)च्या एक लाख लाभार्थ्यांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिला हप्ता जारी केला. यावेळी पंतप्रधानांनी पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

नवी दिल्लीत पोंगल उत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 14th, 12:00 pm

पोंगलच्या पवित्र दिनी, तामिळनाडूच्या प्रत्येक घरात पोंगलच्या धारेचा प्रवाह असतो. माझी अशी इच्छा आहे, की आपल्या आयुष्यात देखील सुख समृद्धी आणि समाधानाच्या धारेचा हा प्रवाह असाच निरंतर वाहत राहो. कालच देशभरात लोहडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काही ठिकाणी आज मकर संक्रांती उत्तरायण साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी, ते कदाचित उद्या साजरे केले जाईल. माघ बिहू देखील, आता येणारच आहे. मी या सर्व सण-उत्सवांसाठी सर्व देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, माझ्या शुभकामना त्यांच्या सोबत आहेत.

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत पोंगल उत्सवात घेतला सहभाग

January 14th, 11:30 am

पंतप्रधानांनी पोंगल निमित्त शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये प्रत्येक घरात या उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह सतत वाहत राहो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. काल साजरा झालेला लोहरी उत्सव, आज साजरा होत असलेले मकर उत्तरायण, उद्या साजरी होणारी मकर संक्रांती आणि लवकरच होणारी माघ बिहूची सुरुवात याचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या देशभर सुरू असलेल्या उत्सवाच्या कालावधीसाठी मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

कातिबिहूच्या शुभ प्रसंगी पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

October 18th, 10:47 pm

कातिबिहूच्या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

काशी विश्वनाथ आणि बिहू सोहळ्या संदर्भातील नागरिकांच्या प्रतिक्रियांना पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला

April 16th, 10:04 am

काशी विश्वनाथ आणि बिहू सोहळ्या संदर्भातल्या विविध मुद्द्यांवरच्या नागरिकांच्या प्रतिक्रियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला आहे.

गुवाहाटी येथे झालेल्या बिहू कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

April 14th, 06:00 pm

आजचे हे दृश्य, टेलिव्हिजनवर बघणारा असो, इथे कार्यक्रमात हजर असणारे असो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. हे अविस्मरणीय आहे, अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, हा आसाम आहे. आसमंतात घुमणारा ढोल, पेपा अरु गॉगोनाचा आवाज संपूर्ण हिंदुस्तान ऐकत आहे. आसामच्या हजारो कलाकारांची ही मेहनत, हे परिश्रम, हा समन्वय आज सगळं जग मोठ्या अभिमानाने बघत आहे. एक तर इतका मोठा क्षण आहे, उत्सव इतका मोठा आहे, दुसरं म्हणजे आपला उत्साह आणि आपली भावना याला तोड नाही. मला आठवतं, जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या काळात मी इथे आलो होतो, तेव्हा म्हणालो होतो की तो दिवस दूर नाही, जेव्हा लोग A पासून Assam म्हणतील. आज खरोखरच आसाम, A-One प्रदेश बनत आहे. मी आसामच्या लोकांना, देशाच्या लोकांना बिहुच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.

आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये पंतप्रधानांनी केली 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

April 14th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये पलाशभरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी, शिवसागरमध्ये रंगघरच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प यांची पायाभरणी, नामरुप येथील 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे उद्घाटन यांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी दहा हजारांपेक्षा जास्त बिहू नर्तकांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याच्या रंगतदार सादरीकरणाचा देखील आनंद घेतला.

पंतप्रधान 14 एप्रिल रोजी आसामला भेट देणार

April 12th, 09:45 am

पंतप्रधान दुपारी 12 वाजता एम्स गुवाहाटी येथे पोहोचतील आणि नवीन बांधलेल्या परिसराची पाहणी करतील. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण करतील. ते आसाम अॅडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूटची (एएएचआयआय- आसाम प्रगत आरोग्य निगा अभिनव संस्था ) पायाभरणी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (एबी -पीएमजेएवाय ) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ मोहिमेचा प्रारंभ करतील.

पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला दिल्या बोहाग बिहूच्या शुभेच्छा

April 14th, 09:54 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला बोहाग बिहूच्या शुभेच्छा दिल्या आहेत.