नाताळ सणानिमित्त, लोककल्याण मार्ग इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
December 25th, 02:28 pm
त्यामुळे, माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे. अनिल जी यांनी मला खूप मदत केली, त्यामुळे, त्यांचे ही मी विशेष आभार मानतो. या उपक्रमासाठी मी मायनॉरिटी फौंडेशनचा देखील आभारी आहे.नाताळच्या निमित्ताने पंतप्रधानांनी साधला ख्रिस्ती समुदायासोबत संवाद
December 25th, 02:00 pm
यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना विशेषतः ख्रिस्ती समुदायाच्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देताना या अतिशय विशेष आणि पवित्र प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. भारतीय अल्पसंख्याक मंचाने दिलेला नाताळ एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले. ख्रिस्ती समुदायाबरोबर प्रदीर्घ काळापासून असलेल्या घनिष्ठ आणि अतिशय जिव्हाळ्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना ख्रिस्ती समुदाय आणि त्यांच्या नेत्यांसोबत ठराविक काळाने होत असलेल्या बैठकांच्या आठवणींना उजाळा दिला. काही वर्षांपूर्वी पवित्र पोप यांच्यासोबत झालेल्या संवादाची त्यांनी आठवण केली आणि तो एक संस्मरणीय क्षण होता असे नमूद करताना, पृथ्वीला एक चांगले स्थान बनवण्यासाठी सामाजिक सौहार्द, जागतिक बंधुभाव, हवामान बदल आणि समावेशक विकास यांसारख्या मुद्यांवरील चर्चा अधोरेखित केली.