भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्‍ट्य

November 25th, 08:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची आज बैठक झाली. यामध्‍ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्‍यात आली.