प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी

April 30th, 11:32 am

आजच्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी ह्यांनी म्हटलं की लाल दिव्यामुळे देशात व्हीआयपी पद्धत सुरू झाली आणि वाढली. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आपण न्यू इंडिया बद्दल बोलतो तेव्हा व्हीआयपी पेक्षा इपीआय जास्त महत्वाचे आहे, इपीआय म्हणजे 'एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट' . पंतप्रधानांनी सुट्ट्यांचा छान वापर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि नवनवीन जागी भेट द्यायला सांगितलं. ते उन्हाळ्याबद्दल भीम अँप बद्दल आणि भारताच्या समृद्ध विविधतेबद्दल देखील खूप विस्ताराने बोलले.

नागपूर येथे विविध सरकारी योजनांच्या राष्ट्रार्पणानंतर झालेल्या सार्वजनिक सभेत पंतप्रधानाचे भाषण

April 14th, 02:31 pm

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य ज्या भूमीवर केले त्या भूमीला माझे वंदन ! काशी जसे ज्ञानाचे नगर आहे, तसेच नागपूरही बनू शकेल का ? आज येथे अनेक नामवंत लोक बसले आहेत सगळ्यांची नावे तर घेऊ शकत नाही. बऱ्याच जणांनी ही नावे घेतली आहेत, तुम्हाला तर लक्षात असतीलच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याची पंतप्रधानांची ग्वाही नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर अभिवादन

April 14th, 02:30 pm

सामाजिक-आर्थिक विकास, पायाभूत सोयी-सुविधा विकास, उच्च शिक्षण, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या ग्वाहीसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्याची सांगता केली.