नवी दिल्लीत आयोजित भारत टेक्स 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 26th, 11:10 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पियूष गोयल जी, दर्शना जरदोश जी, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, फॅशन आणि वस्त्रोद्योग जगताशी संबंधित सर्व मित्र, तरुण उद्योजक, विद्यार्थी, आपले विणकर आणि आपल्या कारागीर मित्रांनो महोदया आणि महोदय! भारत मंडपम येथे आयोजित भारत टेक्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत ! आजचा हा कार्यक्रम खूप विशेष आहे. विशेष यासाठी आहे : कारण भारतातील दोन सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांमध्ये म्हणजेच भारत मंडपम आणि यशोभूमीमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी होत आहे. आज 3 हजाराहून अधिक प्रदर्शक... 100 देशांतील सुमारे 3 हजार खरेदीदार... 40 हजारांहून अधिक व्यापारी अभ्यागत... एकाचवेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम वस्त्रोद्योग कार्यक्षेत्रामधील सर्व भागधारकांना आणि संपूर्ण मूल्य साखळीतील लोकांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत टेक्स 2024 चे उद्घाटन
February 26th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या प्रदर्शनाची देखील पंतप्रधानांनी पाहणी केली.पंतप्रधान 26 फेब्रुवारीला भारत टेक्स 2024 चे करणार उद्घाटन
February 25th, 03:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन करतील.