आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे उद्योग धुरिणांकडून कौतुक
October 15th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (आयटीयू-डब्ल्यूटीएसए) 2024 दरम्यान 8 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन केले. डब्ल्यूटीएसए ही डिजिटल तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ संस्थेच्या मानकीकरण कार्यासाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी प्रशासकीय परिषद आहे. भारत आणि हिंद-प्रशांत क्षेत्र प्रथमच आयटीयू-डब्ल्यूटीएसए चे यजमानपद भूषवत आहे. 190 हून अधिक देशांतील दूरसंचार, डिजिटल आणि आयसीटी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 3,000 हून अधिक उद्योग धुरीण, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांना एकत्र आणणारा हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे.The goal should be to ensure that no country, region, or community is left behind in the digital age: PM Modi
October 15th, 10:05 am
Prime Minister Modi inaugurated the International Telecommunication Union-World Telecommunication Standardization Assembly and India Mobile Congress in New Delhi. In his address, he highlighted India's transformative achievements in connectivity and telecom reforms. The Prime Minister stated that the government has made telecom a means of equality and opportunity beyond just connectivity in the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयटीयू जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा 2024चे केले उद्घाटन
October 15th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा (WTSA) 2024चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 8व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटनही केले. यावेळी प्रदर्शनाची पाहणी त्यांनी केली.पंतप्रधान 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 चे करणार उद्घाटन
October 14th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (डब्ल्यूटीएसए) 2024 चे उद्घाटन करतील.पीएम गतिशक्तीला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी भारत मंडपम मधील अनुभूती केंद्राला दिली भेट
October 13th, 09:44 pm
पीएम गतिशक्तीला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम मधील अनुभूती केंद्राला भेट दिली. भारताच्या पायाभूत सुविधा विकासाच्या प्रवासाला चालना देण्यात पीएम गतिशक्तीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.नवी दिल्लीत दुसऱ्या आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 12th, 04:00 pm
सर्व देशांच्या मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो आणि या दोन दिवसीय शिखर परिषदेत तुम्ही या क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञ मंडळी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जे आपल्या सर्वांच्या वचनबद्धतेचे आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि 80 हजार झाडे लावण्याचा आणि ती ही आईच्या नावाने लावण्याचा एक मोठा उपक्रम आपले मंत्री नायडू जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला. मात्र मी आणखी एका विषयाकडे तुमचे लक्ष आकर्षित करू इच्छितो, आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते, तेव्हा तो आनंद एका वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो; आणि आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी जे काही गणित मांडले आहे, ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते तेव्हा त्या व्यक्तीने सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजेच एक हजार वेळा पूर्ण चंद्र पाहिलेला असतो. याचा अर्थ या क्षेत्रातील आपल्या संघटनेने देखील एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत आणि उड्डाण करून एक प्रकारे त्याला जवळून पाहण्याचा अनुभव देखील घेतला आहे. तर या पृथ्वीच्या लाटेतही 80 वर्षांचा हा अविस्मरणीय प्रवास, यशस्वी प्रवास अभिनंदनास पात्र आहे.पंतप्रधान 12 सप्टेंबर रोजी दुसऱ्या आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार
September 11th, 07:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे दुपारी 4 वाजता नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत . यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत केलेले भाषण
August 31st, 10:30 am
तुम्ही लोक खूप गंभीर आहात, त्यामुळे मला असे वाटते की हा सोहळाही खूप गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी मी राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाला गेलो होतो. आणि, आज सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे, हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. हा आहे भारताच्या संविधानाचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रवास! हा प्रवास आहे- एक लोकशाही म्हणून भारताचा अधिक परिपक्व होण्याचा प्रवास! आणि या प्रवासात आपल्या संविधान निर्मात्यांचे आणि न्यायव्यवस्थेतील अनेक जाणकारांचे योगदान मोलाचे आहे. यात पिढ्यानपिढ्या कोट्यवधी देशबांधवांचे योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. भारतातील जनतेने सर्वोच्च न्यायालयावर, आपल्या न्यायव्यवस्थेवर कधीच अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची ही 75 वर्षे लोकशाहीची माता म्हणून भारताचा बहुमान आणखी वाढवत आहेत. हे आपल्या सांस्कृतिक घोषणेला बळ देते – ज्यामध्ये म्हटले आहे सत्यमेव जयते, नानृतम्. यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून संविधानाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे या प्रसंगी अभिमानही आहे, सन्मान आहे आणि प्रेरणा आहे. या निमित्त मी तुम्हा सर्व विधिज्ञांचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने राष्ट्रीय जिल्हा न्यायिक परिषदेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे केले उदघाटन
August 31st, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी 75 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे प्रकाशन देखील केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी पाच कामकाजांची सत्रे आयोजित केली आहेत; ज्यात पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने, सर्वांसाठी सर्वसमावेशक न्यायालये, न्यायिक सुरक्षा आणि न्यायिक कल्याण, खटल्यांचे व्यवस्थापन आणि न्यायिक प्रशिक्षण,या विषयांचा समावेश आहे.पंतप्रधान 31 ऑगस्ट रोजी, जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार
August 30th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सकाळी10 वाजता जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार आहेत.या प्रसंगी, पंतप्रधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरणही करणार आहेत.'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
July 21st, 07:45 pm
आज भारत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत आहे. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना ज्ञान आणि आध्यात्माच्या या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. अशा महत्वपूर्ण दिनी आज 46 व्या जगतिक वारसा समितीच्या या बैठकीचा प्रारंभ होत आहे. आणि भारतात प्रथमच याचे आयोजन होत आहे. आणि स्वाभाविक आहे माझ्यासह सर्व देशवासियांना याचा विशेष आनंद आहे.मी याप्रसंगी जगभरातून आलेले सर्व मान्यवर आणि अतिथींचे स्वागत करतो. विशेषतः मी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे ऑज़ुले यांचेही अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, जागतिक स्तरावरील प्रत्येक आयोजनाप्रमाणे हा कार्यक्रम देखील भारतात यशाचे नवे विक्रम स्थापित करेल.पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन
July 21st, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन केले. जागतिक वारसा समितीची दरवर्षी बैठक होते आणि जागतिक वारसा विषयक सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्याबरोबरच जागतिक वारसा यादीत नोंदवल्या जाणाऱ्या स्थळांचा निर्णय घेण्याचे दायित्व या समितीकडे असते.भारत प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करत आहे. यावेळी पंतप्रधानांनी विविध प्रदर्शनांना भेट देऊन आढावा घेतला.पंतप्रधान करणार 21 जुलै रोजी भारत मंडपम् मध्ये जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन
July 20th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जुलै रोजी नवी दिल्ली येथे भारत मंडपम् सभागृहात संध्याकाळी सात वाजता जागतिक वारसा समितीच्या 46 व्या बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझुले या देखील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असतील.दिल्लीची प्रगती होत असल्याचे दिसत असताना, इंडी आघाडी त्याचा सत्यानाश करण्यासाठी झटत आहे: पंतप्रधान मोदी ईशान्य दिल्लीतील सभेत
May 18th, 07:00 pm
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रचार सभांच्या धडाक्यात, आज प्रथमच ईशान्य दिल्लीत झालेल्या उत्साही सभेला संबोधित केले. त्यांनी उज्ज्वल भविष्याचे वचन देत आणि राजधानी म्हणून देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात दिल्लीने पुढे राहण्याची गरज त्यांनी स्पष्ट केलीईशान्य दिल्लीतील उत्साही प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण
May 18th, 06:30 pm
पंतप्रधान मोदींनी आपल्या एका पाठोपाठ सुरू असलेल्या प्रचार सभांच्या सत्रात, आज प्रथमच ईशान्य दिल्लीतील उत्साहाने जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी. त्यांनी उज्ज्वल भविष्याचे वचन दिले आणि राजधानी म्हणून दिल्ली देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात अग्रस्थानी असण्याची गरज स्पष्ट केली.Teaching of our Tirthankaras have gained a new relevance in the time of many wars in the world: PM Modi at Bharat Mandapam
April 21st, 11:00 am
PM Modi inaugurated the 2550th Bhagwan Mahavir Nirvan Mahotsav on the auspicious occasion of Mahavir Jayanti at Bharat Mandapam. He underlined that the idea of Amrit Kaal is not merely a resolution but a spiritual inspiration that allows us to live through immortality and eternity.PM inaugurates 2550th Bhagwan Mahavir Nirvan Mahotsav on occasion of Mahavir Jayanti
April 21st, 10:18 am
PM Modi inaugurated the 2550th Bhagwan Mahavir Nirvan Mahotsav on the auspicious occasion of Mahavir Jayanti at Bharat Mandapam. He underlined that the idea of Amrit Kaal is not merely a resolution but a spiritual inspiration that allows us to live through immortality and eternity.Startup has become a social culture and no one can stop a social culture: PM Modi
March 20th, 10:40 am
PM Modi inaugurated the Start-up Mahakumbh at Bharat Mandapam, New Delhi. The startup revolution is being led by small cities and that too in a wide range of sectors including agriculture, textiles, medicine, transport, space, yoga and ayurveda.नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्ट अप महाकुंभचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
March 20th, 10:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्ट-अप महाकुंभचे उद्घाटन केले.यावेळी त्यांनी तेथील प्रदर्शनाची पाहणीही केली.