पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण
August 06th, 11:30 am
देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय, खासदारगण, आमदारगण, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे.पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
August 06th, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.भारत गौरव पर्यटक रेल्वे अंतर्गत गंगा पुष्कराला यात्रा आध्यात्मिक पर्यटनाला चालना देईल: पंतप्रधान
May 01st, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, तेलंगणामधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून, भारत गौरव पर्यटक रेल्वेच्या गंगा पुष्कराला यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. पुरी, काशी आणि अयोध्या या पवित्र शहरांमधून मार्गक्रमण करणारी ही रेल्वे देशातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देईल.बाबासाहेब आंबेडकर यात्रा- भारत गौरव ट्रेनची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 15th, 09:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर यात्रा- भारत गौरव ट्रेन या उपक्रमाची प्रशंसा केली आहे, ज्या गाडीला केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी काल आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून झेंडा दाखवून रवाना केले.