India is not a follower but a first mover: PM Modi in Bengaluru
April 20th, 04:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Bengaluru, Karnataka. Speaking to a vibrant crowd, he highlighted the achievements of the NDA government and outlined plans for the future.PM Modi addresses public meetings in Chikkaballapur & Bengaluru, Karnataka
April 20th, 03:45 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Chikkaballapur and Bengaluru, Karnataka. Speaking to a vibrant crowd, he highlighted the achievements of the NDA government and outlined plans for the future.गोव्यामधील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 26th, 10:59 pm
व्यासपीठावर उपस्थित इतर लोकप्रतिनिधी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष भगिनी पीटी उषा जी, देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले माझे सर्व खेळाडू मित्र, मदतनीस कर्मचारी, इतर पदाधिकारी आणि युवा मित्रांनो, भारतीय क्रीडा महाकुंभाचा प्रवास आज गोव्यात येऊन पोहोचला आहे. सगळीकडे रंग आहे...तरंग आहेत...रोमांच आहे..उत्साह आहे. गोव्याच्या हवेत असेच काहीसे आहे. आपणा सर्वांना सदतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!पंतप्रधानांनी गोव्यामध्ये केले 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
October 26th, 05:48 pm
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गोव्यामध्ये भारतीय खेळांच्या महाकुंभाचा प्रवास सुरू झाला आहे आणि संपूर्ण वातावरण विविध रंग, लहरी, उत्साह आणि साहसाने भरून गेले आहे. गोव्याच्या तेजोवलयासारखे दुसरे काहीच असू शकत नाही असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी गोव्याच्या जनतेचे अभिनंदन केले आणि 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये गोव्याचे योगदान अधोरेखित केले आणि गोव्याच्या फुटबॉल प्रेमाचा दाखला दिला. क्रीडाप्रेमी गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हीच मुळी एक उत्साहाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.भारताच्या पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली कॉरिडॉरचे उद्घाटन आणि नमो भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 20th, 04:35 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय, ऊर्जावान मुख्यमंत्री भाई योगी आदित्यनाथ जी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हरदीप सिंह पुरी जी, वी के सिंह जी, कौशल किशोर जी, इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या कुटुंबीयांनो,पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे भारतातील पहिल्या प्रादेशिक वेगवान स्थानांतरण यंत्रणेचा प्रारंभ
October 20th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे दिल्ली-गाझियाबाद-मीरत आरआरटीएस मार्गिकेच्या प्राधान्यक्रम टप्प्याचे उद्घाटन केले. त्यांनी याच कार्यक्रमात भारतातील प्रादेशिक वेगवान स्थानांतरण यंत्रणेचा (आरआरटीएस)प्रारंभ करताना साहिबाबाद ते दुहाई डेपोदरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिडएक्स गाडीला झेंडा दाखवून रवाना देखील केले. तसेच पंतप्रधानांनी यावेळी बेंगळूरू मेट्रो सेवेच्या पूर्व-पश्चिम मार्गीकेतील दोन टप्प्यांचे लोकार्पण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑक्टोबर रोजी भारतातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीचे (आर आर टी एस) चे उद्घाटन
October 18th, 04:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास साहिबाबाद RapidX स्थानक येथे दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आर आर टी एस कॉरिडॉर या प्राधान्य क्षेत्राचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते साहिबाबाद ते दुहाई डेपोला जोडणाऱ्या RapidX ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून देशातील प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीचे उदघाटन देखील करणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते साहिबाबाद येथे प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीच्या उद्घाटनानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तसेच ते बेंगळुरू मेट्रोच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरचे दोन भाग राष्ट्राला समर्पित करतील.