पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ओदिशा मधील भुवनेश्वर इथे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
September 17th, 04:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या भुवनेश्वरमधे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.पंतप्रधान मोदी यांनी केले के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन
July 15th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमध्ये पीएम-स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना करणार संबोधित
March 13th, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमधील जेएलएन स्टेडियम येथे संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान स्वनिधी (PM SVANidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. यावेळी ते दिल्लीमधील रस्त्यावरील 5,000 विक्रेत्यांसह (एसव्ही) 1 लाख एसव्हींना योजनेंतर्गत कर्जाचे वितरण देखील करतील.पीएम-सूरज पोर्टलच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 13th, 04:30 pm
सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारजी, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनी, इतर मान्यवर, सभ्य स्त्री-पुरुषहो, देशातील 470 जिल्ह्यांतून जवळजवळ 3 लाख लोक आज या कार्यक्रमाशी थेट जोडले गेले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित घटकांना कर्जाचे पाठबळ देण्यासाठीच्या देशव्यापी संपर्क मोहिमे निमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
March 13th, 04:00 pm
मध्य प्रदेश मधील इंदूर येथील नरेंद्र सेन हे क्लाऊड कॉम्प्युटिंगशी संबंधित इंटरनेट कंपनीचे संस्थापक आहेत. सायबर कॅफेचा मालक, ते कोडिंग शिकणे आणि पुढे कंपनीचे संस्थापक होण्यापर्यंतचा आपला प्रवास त्यांनी पंतप्रधानांसमोर उलगडला. त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की सूक्ष्म-लघु-मध्यम (MSME) उद्योगांचे डिजिटलायझेशन करून त्यांचे सक्षमीकरण करणे, हे त्यांचे ध्येय आहे. दुसऱ्या नरेंद्रची कहाणी जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी हलक्याफुलक्या संवादा द्वारे केलेल्या विनंतीवर, सेन यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की ते एका खेडेगावातील आहेत, पण त्यांच्या कुटुंबाने इंदूरला स्थलांतर केले, आणि वाणिज्य क्षेत्रातील पार्श्वभूमी असूनही त्यांना तंत्रज्ञानामध्ये खूप रस आहे. ते पुढे म्हणाले की नॅसकॉमच्या एका कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे भाषण आणि भारतातील क्लाऊड गोदामाची मागणी, यामुळे त्यांना क्लाऊड कॉम्प्युटिंगवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. “गावात बसलेल्या एका नरेंद्रला दुसऱ्या नरेंद्राकडून प्रेरणा मिळाली”, सेन म्हणाले. सरकारी स्तरावरील आव्हाने आणि मदतीबद्दल पंतप्रधानांनी विचारल्यावर सेन म्हणाले की त्यांच्या मदतीची विनंती तत्कालीन माहिती तंत्रज्ञान सचिवांनी मंजूर केली, ज्यामुळे भारतातील पहिले डेटा सेंटर पार्क विकसित झाले. सेन आणि इतर तरुणांनी स्टार्टअप्समध्ये रस घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च 2024 रोजी वंचित घटकांना कर्ज सहाय्य देण्यासाठी आयोजित देशव्यापी संपर्क कार्यक्रमात सहभागी होणार
March 12th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता वंचित घटकांना कर्ज सहाय्य देण्याच्या उद्देशाने आयोजित देशव्यापी संपर्क कार्यक्रमात दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी होतील. पंतप्रधान पीएम-सूरज, अर्थात राष्ट्रीय सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण (PM-SURAJ) पोर्टलचा शुभारंभ करतील आणि देशातील वंचित गटातील एक लाख उद्योजकांना कर्ज सहाय्य मंजूर करतील. याशिवाय, अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि स्वच्छता सेवकांसह वंचित गटांतील विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.पंतप्रधान, 18 जानेवारी रोजी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद
January 17th, 05:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, 18 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी पीएम जनमन अंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता करणार जारी
January 14th, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय - जी) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करतील. यावेळी, पंतप्रधान पीएम-जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी संवादही साधतील.पंतप्रधानांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
January 03rd, 01:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.