पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधानांची घेतली भेट

November 21st, 09:13 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया अमोर मोटली‌ यांची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे भारत-CARICOM शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. या उच्च-स्तरीय भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि बार्बाडोस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना दुजोरा दिला आणि मजबूत करण्यासाठी संमती दर्शवली.