पंतप्रधानांनी बंजारा संस्कृती आणि तेथील लोकांबद्दलचे त्यांचे संस्मरणीय अनुभव केले सामाईक
October 05th, 06:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशीम भेटीदरम्यानचे बंजारा संस्कृती आणि तेथील लोकांबद्दलचे त्यांचे संस्मरणीय अनुभव सामाईक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये बंजारा समाजातील संतांची घेतली भेट
October 05th, 05:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. या संतांनी समाज सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय हा बंजारा संस्कृती साजरी करण्याचा स्तुत्य प्रयत्न : पंतप्रधान
October 05th, 04:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोहरादेवी येथे बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले. इतिहास आणि संस्कृतीची आवड असलेल्या सर्वांनी संग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला
October 05th, 02:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. महान बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.वाशिम, महाराष्ट्र येथे कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उपक्रमांच्या आरंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 05th, 12:05 pm
आजच्या भव्य सभेत उपस्थित असणाऱ्या संपूर्ण देशभरातील आमच्या आदरणीय बंधू आणि भगिनींना मी अभिवादन करतो - जय सेवालाल! जय सेवालाल!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा केला शुभारंभ
October 05th, 12:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. या उपक्रमांमध्ये पीएम-किसान (PM-KISAN) सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता जारी, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण, 9,200 शेतकरी उत्पादक संस्था, संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क, आणि पशुधनासाठी युनिफाइड जीनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ, याचा समावेश होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा करणार शुभारंभ
October 04th, 05:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते वाशिमकडे प्रयाण करतील आणि सकाळी 11.15 वाजता पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सकाळी 11:30 वाजता, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी 4 वाजता, पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता, मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पंतप्रधान बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान मेट्रो द्वारा प्रवास देखील करणार आहेत.