भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईनच्या दूरदृश्य प्रणाली मार्फत संयुक्त उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

March 18th, 05:10 pm

आज भारत-बांगलादेश संबंधांच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइन ज्याची पायाभरणी आम्ही सप्टेंबर 2018 मध्ये केली होती. आज पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमवेत या पाइपलाइनचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे याचा मला आनंद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्तपणे भारत-बांगलादेश मैत्री तेल ऊर्जावाहिनीचे केले उद्घाटन

March 18th, 05:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज संयुक्तपणे भारत-बांगलादेश मैत्री तेल ऊर्जावाहिनीचे (आयबीएफपी) आभासी माध्यमातून उद्घाटन केले.या तेल ऊर्जावाहिनी बांधकामाची पायाभरणी सप्टेंबर 2018 मध्ये दोन्ही पंतप्रधानांनी केली होती. 2015 पासून नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड बांगलादेशला पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करत आहे. भारत आणि त्याच्या शेजारी देशांमधील ही दुसरी सीमापार तेल ऊर्जा वाहिनी आहे.

पंतप्रधानांनी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली

March 27th, 01:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुंगीपाडा येथे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही राष्ट्रप्रमुखांनी किंवा राज्यप्रमुखांनी किंवा शासनप्रमुखांनी बंगबंधूंच्या या समाधीस्थळाच्या वास्तूला भेट देणे हे प्रथमच घडले आहे, ही अशी पहिलीची भेट नोंदविली गेली आहे. ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बकुळीच्या झाडाचे रोपे याठिकाणी लावले. यावेळी त्यांच्याबरोबर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या भगिनी शेख रेहाना यांच्यासह उपस्थित होत्या.