राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-334बी वर 40.2 किमी पट्टयात शाश्वत साहित्याचा वापर केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

June 14th, 10:57 pm

वाया गेलेले प्लॅस्टिक आणि फ्लाय ऍश यांसारख्या शाश्वत साहित्याच्या वापराला प्राधान्य देऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 334बी च्या 40.2 किमी पट्टयाचा किफायतशीरपणा आणि पर्यावरण पूरकता वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यूपी-हरयाणा सीमेजवळ बाघपतपासून हा पट्टा सुरू होतो आणि हरयाणामध्ये रोहना येथे समाप्त होतो.

पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील

December 01st, 12:06 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता देहरादूनला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रकल्पांवर या भेटीचा एक महत्त्वाचा भर असेल, ज्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि या प्रदेशात पर्यटन देखील वाढेल. एके काळी दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारले जात आहेत.