शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
November 15th, 10:17 am
विनोदबुद्धीने परिपूर्ण, विद्वत्ता आणि भारतीय इतिहासाचे समृध्द भांडार असलेले व्यक्तिमत्व असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल पुरंदरे यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमात पुरंदरे यांनी केलेले भाषण देखील पंतप्रधानांनी सर्वांसाठी सामायिक केले.बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभरीनिमित्त झालेल्या सत्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
August 13th, 08:36 pm
या कार्यक्रमात आम्हाला आशीर्वाद देणारे आदरणीय बाबासाहेब पुरंदरेजी, बाबासाहेब सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा ताई आणि शिवशाहीवर विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांचे सर्व अनुयायी आणि साथीदार!शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
August 13th, 08:34 pm
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेजी यांनी त्यांच्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त आयोजित समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांचे जीवन हे आपल्या ऋषीमूनींनी स्पष्ट केलेल्या सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या दक्ष जीवनाचे उदाहरण आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात त्यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण हा आनंददायी योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले.