नवी दिल्ली इथे झालेल्या बी 20 शिखर परिषद भारत 2023 मधील पंतप्रधानांचे भाषण
August 27th, 03:56 pm
आपण सर्व जण उद्योग जगतातील अग्रणी नेते अशा वेळी भारतात आला आहात , जेव्हा संपूर्ण देशभरात एखाद्या महोत्सवाप्रमाणे वातावरण आहे. भारतात दर वर्षी येणारा महोत्सवाचा कालावधी काहीसा आधीच सुरु झाला आहे. हा सणासुदीचा काळ असा असतो, जो आमचा समाज देखील साजरा करतो आणि आमचे उद्योग देखील.. आणि या वर्षी हा 23 ऑगस्ट पासूनच सुरु झाला आहे. आणि हा उत्सव आहे चंद्रावर चांद्रयान पोहोचण्याचा. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेत आमची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ची अत्यतं महत्वपूर्ण भूमिका आहे. मात्र या मोहिमेला भारतातील उद्योगांनी देखील मोठे योगदान दिले आहे. चांद्रयानासाठी वापरलेले अनेक घटक आणि भाग आमच्या उद्योगांनी, आमच्या खाजगी कंपन्यांनी, आमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आवश्यकतेनुसार तयार करून अगदी वेळेत उपलब्ध करून दिले. म्हणजेच हे यश, विज्ञान आणि उद्योग या दोघांचे आहे. आणि महत्वाचे म्हणजे या वेळी हे यश भारतासोबतच संपूर्ण जगात साजरे केले जात आहे. हा उत्सव देशाच्या विकासाला गती देण्याबद्दल साजरा केला जात आहे आणि हा सोहळा एक जबाबदार अंतराळ कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आहे. हा उत्सव नवोन्मेषाचा आहे. हा सोहळा अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वतता आणि समानता आणण्याचा आहे. आणि या बी 20 शिखर परिषदेची संकल्पना देखील तीच आहे - RAISE अर्थात जबाबदारी, वेग, नवोन्मेष, शाश्वतता आणि समानता. आणि, हे मानवतेबद्दल आहे. हे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य याबद्दल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी-20 परिषद भारत 2023,च्या बैठकीला केले संबोधित
August 27th, 12:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत बी-20 परिषद भारत 2023, या बैठकीला संबोधित केले. भारतातील या बी-20 परिषदेने, जगभरातील धोरणकर्ते, आघाडीचे व्यावसायिक-उद्योजक आणि तज्ञांना, बी-20 भारताच्या घोषणापत्रावर चर्चा आणि विचारमंथनासाठी एकत्र आणले आहे. जी-20 मध्ये सादर करावयाच्या, 54 शिफारशी आणि 172 धोरणात्मक कार्यवाहींचा, या घोषणापत्रात समावेश आहे.पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी, बी (बिझनेस) -20 शिखर परिषदेला संबोधित करणार
August 26th, 09:55 pm
बी-20 शिखर परिषद - इंडिया अंतर्गत, धोरणकर्ते, व्यवसाय प्रमुख आणि जगभरातील तज्ञांना एका मंचावर आणत, बी-20 इंडिया’च्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जाते. या बी-20 इंडिया परिषदेत 54 शिफारशी आणि 172 धोरणात्मक कृती तपशील जी-20 मध्ये सादर केले जाणार आहेत.