प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेची (RWBCIS) अंमलबजावणी करण्यासाठी सध्या लागू असलेल्या केंद्रीय योजनेची वैशिष्ट्ये/तरतुदींमध्ये सुधारणा/तरतुदी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
January 01st, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरु ठेवायला मंजुरी दिली. योजनेच्या 2021-22 ते 2025-26 या काळासाठी एकूण रु.69,515.71 कोटी खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना आकस्मिक नैसर्गिक आपत्तींमुळे उद्भवणाऱ्या जोखमीपासून पिकाचे संरक्षण करायला मदत होईल. या व्यतिरिक्त, योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने 824.77 कोटी रुपयांच्या निधीसह नवोन्मेश आणि तंत्रज्ञानासाठी (FIAT) निधी स्थापन करायला मंजुरी दिली, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल, तसेच दाव्यांची मोजणी आणि त्याची पूर्तता होण्याचे प्रमाण वाढेल. YES-TECH, WINDS ई. योजनेंतर्गत तंत्रज्ञान विषयक उपक्रमांना निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच संशोधन आणि विकास अभ्यासासाठी या निधीचा वापर केला जाईल.