भारतीय पॅरालिम्पिक चमूने आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रचंड अभिमान आणि आनंदाची भावना व्यक्त

September 04th, 04:33 pm

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरालिम्पिक दलाने आपल्या देशासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे. मोदी यांनी खेळाडूंच्या समर्पण आणि जिद्दीची प्रशंसा केली आणि प्रत्येक खेळाडूचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदींचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाशी संवाद

August 19th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी खेळीमेळीत संवाद साधला. पंतप्रधानांनी शीतल देवी, अवनी लेखरा, सुनील अंतील, मरियप्पन थंगावेलू आणि अरुणा तन्वर या खेळाडूंशी वैयक्तिकरित्या बातचीत केली. त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या सांगता प्रसंगी पंतप्रधानांनी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे केले कौतुक

August 11th, 11:40 pm

फ्रान्समधल्या पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक 2024 ची आज सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.