मुंबईतल्‍या 'अभिजात मराठी भाषा' कार्यक्रमात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

October 05th, 07:05 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, माझे केंद्रातील सर्व सहकारी, अनेक पिढ्यांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशाताई जी. अभिनेते बंधू सचिन जी, नामदेव कांबळे जी, सदानंद मोरे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री बंधू दीपक जी, मंगलप्रभात लोढा जी, भाजपा मुंबई अध्यक्ष बंधू आशिष जी, इतर मान्यवर बंधू आणि भगिनी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुंबई येथे अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात सहभाग

October 05th, 07:00 pm

मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा क्षण महत्वाचा असून, हे मराठी भाषेच्या इतिहासातील सोन्याचे पान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित आकांक्षा पूर्ण झाल्या असून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक कामगिरीचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगून, पंतप्रधानांनी या भाषांशी संबंधित जनतेचे अभिनंदन केले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे आणि या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या प्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी लोकांना वेदांमधील ज्ञानाशी जोडले आणि ज्ञानेश्वरीने गीतेचा बोध लोकांपर्यंत पोहोचवून भारताचे आध्यात्मिक ज्ञान पुन्हा जागे केले.

मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

October 03rd, 09:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.

ज्येष्ठ आसामी अभिनेते निपोन गोस्वामी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

October 27th, 02:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ आसामी अभिनेते निपोन गोस्वामी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हेमकोश’ या आसामी शब्दकोशाची ब्रेल लिपीतील प्रत प्रदान

September 21st, 07:26 pm

‘हेमकोश’ या आसामी शब्दकोशाच्या ब्रेल आवृत्तीची प्रत जयंता बरुआ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केली. हेमकोश हा १९व्या शतकातील सुरुवातीच्या आसामी शब्दकोशांपैकी एक आहे. ब्रेल आवृत्तीच्या प्रकाशनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल जयंता बरुआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोदी यांनी कौतुक केले.

NDA Govt has ensured peace and stability in Assam: PM Modi in Bokakhat

March 21st, 12:11 pm

Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a public meeting in Bokakhat, Assam. He said, “It is now decided that Assam will get 'double engine ki sarkar', 'doosri baar, BJP sarkar’, ‘doosri baar, NDA sarkar’. “Today I can respectfully say to all our mothers, sisters and daughters sitting here that we have worked hard to fulfill the responsibility and expectations with which you elected the BJP government,” he added.

PM Modi addresses public meeting at Bokakhat, Assam

March 21st, 12:10 pm

Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a public meeting in Bokakhat, Assam. He said, “It is now decided that Assam will get 'double engine ki sarkar', 'doosri baar, BJP sarkar’, ‘doosri baar, NDA sarkar’. “Today I can respectfully say to all our mothers, sisters and daughters sitting here that we have worked hard to fulfill the responsibility and expectations with which you elected the BJP government,” he added.

सोशल मीडिया कॉर्नर 1 जनवरी 2018

January 01st, 07:46 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पीएम इंडिया बहुभाषी संकेतस्थळ आता 13 भाषांमध्ये उपलब्ध

January 01st, 03:29 pm

आजच्या अनावरणानंतर पीएमइंडिया हे संकेतस्थळ इंग्रजी आणि हिंदीसह मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्ल्याळम, मणिपूरी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्येही उपलब्ध झाले आहे.