पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीचे केले कौतुक
August 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक स्तरावर अव्वल 3 क्रमांकामध्ये पोहोचली आहे. पंतप्रधानांनी याचे श्रेय नवोन्मेषी युवा शक्तीला दिले आहे. येत्या काळात ही प्रगती अशीच कायम ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
June 17th, 12:58 pm
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातातल्या बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळाला भेट देण्यासाठी निघाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.Viksit Bharat Ambassadors Meetup for 'Viksit Bharat, Viksit Mumbai' in Ghatkopar East
May 17th, 04:14 pm
Viksit Bharat Ambassadors met at Bhatia Wadi in Ghatkopar East, Mumbai, to engage with the local diamond merchant and traders community. Over 300 members from the area joined the event, which was honoured by the presence of Sh. Ashwini Vaishnaw, Union Minister for Railways, Communications, and IT. A free-flowing exchange took place, with participants voicing their suggestions and experiences directly to the Minister.टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 12th, 07:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलुरूमधील टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन
April 01st, 03:51 pm
इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
April 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.