For ages, conservation of wildlife and habitats has been a part of the cultural ethos of India: PM
February 17th, 01:37 pm
Addressing a convention on Conservation of Migratory Species of Wild Animals at Gandhinagar, PM Modi said, India has been championing Climate Action based on the values of conservation, sustainable lifestyle and green development model. He said that India was one of the few countries whose actions were compliant with the Paris Agreement goal of keeping rise in temperature to below 2 degree Celsius.स्थलांतरित वन्य जीव संरक्षणावरच्या 13 व्या परिषदेचे पंतप्रधानांकडून गांधीनगर येथे उद्घाटन
February 17th, 12:09 pm
स्थलांतरित वन्य जीव संरक्षणावरच्या 13 व्या सीओपी अर्थात कॉन्फरन्स ऑफ पार्टीज्चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज गांधीनगर येथे उद्घाटन केले. जगातल्या सर्वात वैविध्यता असणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. जगातल्या भूमीपैकी 2.4 टक्के भूमी असणाऱ्या भारताचे जागतिक जैवविविधतेत 8 टक्के योगदान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. वन्य जीव आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण हा प्राचीन काळापासून भारताच्या संस्कृतीचा भाग असल्याचे सांगून यामुळे करुणा आणि सहअस्तित्व याला प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अहिंसा आणि निसर्ग आणि जीवसृष्टीचे संरक्षण या गांधीजींच्या मूल्यांचे प्रतिबिंब भारताच्या राज्यघटनेत आणि इतर कायद्यांमध्येही दिसून येते.पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय वेसक दिन समारंभात भाषण केले
May 12th, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात भाषण केले. ह्या प्रसंगी बोलताना श्री मोदी ह्यांनी सांगितलं की गौतम बुद्धांची शिकवण शासन, संस्कृती आणि तत्वप्रणालीमध्ये खोलवर रुजली आहे. पंतप्रधान म्हणाले, “ आमच्या धर्मानी जगाला गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांची भेट दिली आहे.”प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी
April 30th, 11:32 am
आजच्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी ह्यांनी म्हटलं की लाल दिव्यामुळे देशात व्हीआयपी पद्धत सुरू झाली आणि वाढली. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आपण न्यू इंडिया बद्दल बोलतो तेव्हा व्हीआयपी पेक्षा इपीआय जास्त महत्वाचे आहे, इपीआय म्हणजे 'एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट' . पंतप्रधानांनी सुट्ट्यांचा छान वापर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि नवनवीन जागी भेट द्यायला सांगितलं. ते उन्हाळ्याबद्दल भीम अँप बद्दल आणि भारताच्या समृद्ध विविधतेबद्दल देखील खूप विस्ताराने बोलले.