पंतप्रधानांनी वाहिली आर्य समाजाच्या स्मारकाला आदरांजली

November 22nd, 03:09 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज गयाना येथील जॉर्जटाऊन मधील,आर्य समाज स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.गयानामधील भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आणि भूमिकेची श्री मोदींनी प्रशंसा केली. स्वामी दयानंद सरस्वती यांची या वर्षी 200 वी जयंती आम्ही साजरी करत असल्याने हे वर्ष देखील खूप खास आहे,असे त्यांनी यावेळी नमूद केली.