Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella meets Prime Minister, Shri Narendra Modi
January 06th, 09:44 pm
Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella met with Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi.The US National Security Advisor calls on PM Modi
January 06th, 07:43 pm
The US National Security Advisor Mr. Jake Sullivan called on Prime Minister Shri Narendra Modi today.कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात पुढाकार घेण्यास भारत वचनबद्ध - पंतप्रधान
January 04th, 02:42 pm
भारतीय उद्योजक विशाल सिक्का यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट आंतरिक संवाद ठरल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की नवोन्मेष आणि युवा पिढीसाठी संधी निर्माण करण्यावर भर देऊन कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात पुढाकार घेण्यास भारत वचनबद्ध आहे. पंतप्रधान आणि विशाल सिक्का या दोघांनी कृत्रिम प्रज्ञेचा वापर आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम तसेच भविष्यातील अनेक अनिवार्य गोष्टी या सर्व बाबींवर सविस्तर व व्यापक चर्चा केली.संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 29th, 11:30 am
मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !PM Modi's candid interaction with Rashtriya Bal Puraskar winners
December 26th, 09:55 pm
PM Modi interacted with the 17 awardees of Rashtriya Bal Puraskar in New Delhi. During the candid interaction, the PM heard the life stories of the children and encouraged them to strive harder in their lives. He congratulated all the youngsters and wished them the very best for their future endeavours.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद
December 26th, 09:54 pm
पंतप्रधानांनी या मुलाच्या जगण्याविषयी जाणून घेतले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके लिहिलेल्या एका लहान मुलीला त्यांनी पुस्तकांना कसा प्रतिसाद आहे असे विचारले असता तिने सांगितले की इतर लहान मुलेही आपापली पुस्तके लिहू लागली आहेत. तेव्हा मोदी यांनी इतर लहान मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल तिचे कौतुक केले.वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण
December 26th, 12:05 pm
आज आपण सगळे इथं आपला तिसरा वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. वीर साहिबजादांच्या बलिदानाच्या अमर स्मृतीप्रित्यर्थ तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारनं वीर बाल दिवस साजरा करायला सुरुवात केली. आज हा दिवस अख्ख्या देशासाठी, देशातल्या करोडो लोकांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा उत्सव ठरला आहे. या दिवसानं भारतातल्या कित्येक मुलांमध्ये आणि युवकांमध्ये अदम्य साहसाची भावना जागृत केली आहे. शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि कला यासारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या देशातल्या १७ मुलांचा आज सन्मान करण्यात आला. भारतातल्या लहान मुलांमध्ये, युवा पिढीत खूप काही करुन दाखवण्याची क्षमता आहे, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे. आजच्या या दिवशी मी आपल्या गुरुजनांना, वीर साहिबजादांना वंदन करुन पुरस्कार मिळालेल्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो. या सर्वांचं मी संपूर्ण देशाच्या वतीनं अभिनंदन करतो.नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
December 26th, 12:00 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी भारतीयांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा सण बनला असल्याचे त्यांनी सांगितले. या दिवसाने अनेक मुलांना आणि युवांना दुर्दम्य साहसाची प्रेरणा दिली आहे. मोदी यांनी आज शौर्य, नवनिर्मिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रात वीर बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या 17 मुलांचे कौतुक केले. आजचे पुरस्कार विजेते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या भारतीय मुले आणि युवांच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधानांनी यावेळी गुरूंना आणि वीर साहिबजादांना आदरांजली अर्पण केली आणि पुरस्कार विजेत्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.The World This Week on India
December 24th, 11:59 am
India’s footprint on the global stage this week has been marked by a blend of diplomatic engagements, economic aspirations, cultural richness, and strategic initiatives.The World This Week on India
December 17th, 04:23 pm
In a week filled with notable achievements and international recognition, India has once again captured the world’s attention for its advancements in various sectors ranging from health innovations and space exploration to climate action and cultural influence on the global stage.उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 13th, 02:10 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेशचे मंत्री, सहकारी खासदार आणि आमदार, प्रयागराजचे महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण
December 13th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जे महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत. महाकुंभची भव्य व्याप्ती आणि आकार लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे जिथे 45 दिवस चालणाऱ्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी संपूर्ण नवीन शहर उभारले जाते. प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एकतेच्या या ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल असे सांगितले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
December 11th, 05:00 pm
मी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहमी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे तो तुमच्या लक्षात असेलच. हे म्हणालो होतो ‘सबका प्रयास’, आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांनीच जलद गतीने प्रगती करू शकतो. आजचा हा दिवस याचेच उदाहरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या या ग्रँड फिनाले ची मला बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती. जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या युवा नवोन्मेषकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, मला खूप काही जाणून घेण्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची नामी संधी मिळते. माझ्या तुम्हा सगळ्यांकडून खूप काही अपेक्षा देखील असतात. 21 व्या शतकातील भारताकडे पाहण्याचा तुम्हा सर्व नवोन्मेषकांचा दृष्टिकोन वेगळाच आहे आणि म्हणूनच तुमचे पर्याय देखील वेगळेच असतात. म्हणूनच जेव्हा तुमच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात तेव्हा तुम्ही त्यांचे नवीन आणि अनोख्या प्रकारचे उत्तर शोधून काढता. मी यापूर्वी देखील अनेक हॅकेथॉन’चा भाग झालो होतो. तुम्ही माझी कधीही निराशा केली नाही. नेहमीच माझा विश्वास वाढवला आहे. तुमच्या पूर्वीचे जे संघ होते, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. आज ते पर्याय वेगवेगळ्या मंत्रालयात खूप कमी येत आहेत. आता या हॅकेथॉन मध्ये देशाच्या विविध भागातून आलेले संघ काय करत आहेत? मी मी तुमच्या नवोन्मेषाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर मग सुरुवात करू, सर्वप्रथम कोण आमच्याशी संवाद साधणार आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील सहभागींशी साधला संवाद
December 11th, 04:30 pm
नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषकर्त्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण दिलेल्या 'सबका प्रयास' या मंत्राचा पुनरुच्चार केल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना करून दिली. आजचा भारत सबका प्रयास अर्थात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रगतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की युवा नवोन्मेषीच्या बरोबर असताना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तरुण नवोन्मेषांकडून खूप अपेक्षा असून त्यांच्याकडे एकविसाव्या शतकातील भारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे उपाय वेगळे असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादे नवीन आव्हान उभे राहते तेव्हा तुम्ही नवीन आणि अभिनव उपाय सादर करता असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही हॅकेथॉनला आपण उपस्थित होतो याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की या उपक्रमातून मिळालेल्या यशाने आपल्याला कधीच निराश केले नाही. “तुम्ही माझा विश्वास वाढवला आहे”, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की याआधीचे अभिनव उपाय विविध मंत्रालयांमध्ये अंमलात आणले जात आहेत. आपल्याला सहभागींबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल असे सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधणार संवाद
December 09th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.पंतप्रधान पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या ५९व्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी
December 01st, 07:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2024 रोजी भुवनेश्वर येथे पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या 59 व्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित होते.प्रशासनासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डाटा संदर्भातील जाहिरनामा - अनेक जी 20 देशांनी, अतिथी देशांनी तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिलेले आणि भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या जी 20 मधील त्रयीतर्फे सादर करण्यात आलेले संयुक्त परिपत्रक
November 20th, 07:52 am
केवळ 3 टक्क्याची जागतिक वृद्धी ही या शतकातील सर्वात नीचांकी वृद्धी असून महामारीच्या आधीपर्यंत या वृद्धीचा दर सुमारे 4 टक्के होता. त्याच वेळी तंत्रज्ञान मात्र भोवळ आणणाऱ्या वेगाने प्रगती करत असून जर न्याय्य पद्धतीने वापरले तर हे तंत्रज्ञान आपल्याला वृद्धीचा दर वाढवण्याची ऐतिहासिक संधी देते, असमानता कमी करते आणि शाश्वत विकास उद्दीष्ठांची (एसडीजीज)पूर्तता करण्यातील दरी भरून काढण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल ठरते.डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापनावर भर ही सर्वसमावेशक विकास साध्य करण्याची आणि जागतिक स्तरावर जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे: पंतप्रधान
November 20th, 05:04 am
सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन बदलण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर दिला.Maharashtra will lead the vision of a ’Viksit Bharat’, and the BJP and Mahayuti are working with this commitment: PM in Panvel
November 14th, 02:50 pm
At rally in Panvel, PM Modi highlighted the region's rich marine resources and outlined government efforts to empower the coastal economy. He mentioned initiatives such as the introduction of modern boats and navigation systems, along with the PM Matsya Sampada Yojana, which provided thousands of crores in assistance to fishermen. The government also linked fish farmers to the Kisan Credit Card and launched schemes for the Mahadev Koli and Agari communities. He added that ₹450 crore was being invested to develop three new ports in Konkan, which would further boost fishermen's incomes and support the Blue Economy.PM Modi delivers impactful addresses in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Maharashtra
November 14th, 02:30 pm
In powerful speeches at public meetings in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Prime Minister Narendra Modi highlighted the crucial choice facing Maharashtra in the upcoming elections - between patriotism and pisive forces. PM Modi assured the people of Maharashtra that the BJP-Mahayuti government is dedicated to uplifting farmers, empowering youth, supporting women, and advancing marginalized communities.