जर तुम्ही कुत्रा पाळण्याचा विचार करणार असाल, तर स्थानिक प्रजातीच्या श्वानाला आपल्या घरी घेऊन या, पंतप्रधानांचे मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन
August 30th, 04:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित श्वानांचा उल्लेख केला. ते म्हणाले, आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत त्यांनी अनेक बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, आयईडी आणि दारुगोळा शोधून काढल्याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. बीड पोलिसांनी साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला, रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली होती, याचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.चला खेळांना सुरुवात होऊ द्याः आत्मनिर्भरतेसाठी खेळणी क्षेत्राला बळकटी देण्याचे पंतप्रधान मोदींचे मन की बातमध्ये आवाहन
August 30th, 11:00 am
मित्रांनो, या दिवसात ओणमचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण चिणगम महिन्यात येतो. या काळात लोक काही ना काही नवीन खरेदी करतात, आपल्या घरांची सजावट करतात, पक्क्लम बनवतात, ओणम-सादियाचा आनंद घेतात. वेगवेगळे खेळ, स्पर्धांचे आयोजनही केले जाते. ओणमचा उत्साह, आता दूर-सुदूर अगदी परदेशांमध्येही पोचला आहे. अमेरिका असो, यूरोप असो किंवा आखाती देश असो; ओणमचा उत्साह सगळीकडे पहायला मिळतोच. ओणम आता एक आंतरराष्ट्रीय सण बनत आहे.