पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

February 08th, 01:00 pm

हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.

पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

February 08th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.