पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंचे केले अभिनंदन.

September 02nd, 11:40 pm

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकून शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.

तमिळनाडूत चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन

January 19th, 06:33 pm

13 व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो.भारतीय क्रीडा विश्वासाठी 2024 ची सुरवात करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.इथे जमलेले माझे युवा मित्र युवा भारत,नव भारताचे प्रतिनिधित्व करतात. यांची ऊर्जा आणि उत्साह क्रीडा विश्वात आपल्या देशाला नव्या शिखरावर नेत आहे.देशभरातून चेन्नईला आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना माझ्या शुभेच्छा.आपण सर्वजण एकत्रितपणे खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन घडवत आहात.तामिळनाडूचे स्नेह पूर्ण लोक,लालित्यपूर्ण तमिळ भाषा,संस्कृती आणि खाद्य संस्कृती यामुळे आपणा सर्वांना आपुलकीचा प्रत्यय येईल.त्यांचे आदरातिथ्य आपणा सर्वांची मने जिंकेल याचा मला विश्वास आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्यातल्या कौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी नक्कीच देईल.त्याचबरोबर आपल्याला आयुष्य भर साथ देणारी नवी मैत्रीही जोडण्यासाठी मदत करेल.

पंतप्रधानांच्या हस्ते तमिळनाडूतील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्‌घाटन

January 19th, 06:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 सोहळ्याचे उद्घाटन केले. मोदी यांनी प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रतीक म्हणून त्यांनी दोन खेळाडूंनी दिलेली स्पर्धेची मशाल एका मोठ्या भांड्यात (cauldron) ठेवली.

बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे केले अभिनंदन

November 23rd, 10:58 am

बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे अभिनंदन केले आहे.

आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 27th, 12:34 am

हांगझो आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुष दुहेरी रिकर्व्ह स्पर्धेत तिरंदाज हरविंदर सिंग आणि साहिल यांनी कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

October 25th, 04:40 pm

चीन मध्ये हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुष दुहेरी रिकर्व्ह स्पर्धेत तिरंदाज हरविंदर सिंग आणि साहिल यांनी कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मुंबईत झालेल्या 141व्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 14th, 10:34 pm

140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे या विशेष आयोजनात स्वागत करतो, अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनच्या या 141 व्या सत्राचे भारतात आयोजन होणे अतिशय विशेष आहे. 40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे हे सत्र आयोजित होणे आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.

पंतप्रधानांनी 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे मुंबईत केले उद्घाटन

October 14th, 06:35 pm

भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा खेळ हा एक महत्त्वाचा भाग असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्यावेळी तुम्ही भारतातील गावांमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला खेळाशिवाय कोणताही सण हा अपूर्ण असल्याचे दिसेल असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत पण आम्ही खेळ जगत असतो असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये प्रतिबिंबित होत असलेली क्रीडा संस्कृती अधोरेखित केली मग ती सिंधू संस्कृती असेल वेदिक कालखंड असेल किंवा त्यानंतरचा कालखंड असेल भारताचा क्रीडा वारसा हा अतिशय समृद्ध राहिला आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

October 10th, 06:25 pm

140 कोटी देशवासीयांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.याच ठिकाणी,याच स्टेडीयममध्ये 1951 मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या हा सुखद योगायोग आहे. आज आपणा सर्वांनी जी कामगिरी केली आहे,जे यश साध्य केले आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात उत्सवी वातावरण आहे. पदकांचा 100 चा टप्पा ओलांडण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत केलीत.आशियाई क्रीडा स्पर्धेत आपणा सर्व खेळाडूंच्या कामगिरीने अवघ्या देशामध्ये अभिमानाची भावना दाटून आली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांनी केले संबोधित

October 10th, 06:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके जिंकली ज्यामुळे खंडीय बहु-क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या एकूण पदकांच्या संख्येच्या दृष्टीने ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

कंपाउंड तिरंदाजी प्रकारात रौप्य पदक मिळवल्याबद्दल अभिषेक वर्माचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

October 07th, 08:39 am

आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाउंड तिरंदाजीमध्ये एकल प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल तिरंदाज अभिषेक वर्मा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस प्रवीण देवतळेचे केले कौतुक

October 07th, 08:36 am

आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओजस प्रवीण देवतळेचे कौतुक केले आहे.

PM hails Jyothi Surekha Vennam for a momentous Gold in Compound Archery

October 07th, 08:33 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Jyothi Surekha Vennam for Gold Medal in Compound Archery at the Asian Games.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष तिरंदाजीमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अतनु दास, तुषार शेळके आणि बोम्मदेवरा धीरज यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

October 06th, 06:55 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अतनु दास, तुषार शेळके आणि बोम्मदेवरा धीरज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिरंदाज चमूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 05th, 10:59 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुषांच्या तिरंदाज चमूने, कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी या चमूतील अभिषेक वर्मा, ओजस प्रवीण देवतळे आणि प्रथमेश जावकर यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी अशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिरंदाजीतील कंपाऊड प्रकारात महिला संघाने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल केले कौतुक

October 05th, 11:21 am

होंगझू येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योती सुरेखा वेण्णम, परनीत कौर आणि आदिती गोपीचंद यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी अशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिरंदाजीतील कंपाऊड प्रकारात महिला संघाने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल केले कौतुक

October 04th, 12:52 pm

होंगझू येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योती सुरेखा वेण्णम, परनीत कौर आणि आदिती गोपीचंद यांचे अभिनंदन केले आहे.

युवा जागतिक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये 11 पदके मिळवल्याबद्दल भारताच्या कनिष्ठ आणि कॅडेट तिरंदाजांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

July 10th, 10:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा जागतिक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये 11 पदके मिळवल्याबद्दल भारताच्या कनिष्ठ आणि कॅडेट तिरंदाजांचे अभिनंदन केले आहे.

मणिपूरमधील विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 04th, 09:45 am

मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह जी , उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी भूपेंद्र यादव जी, राजकुमार रंजन सिंह जी, मणिपूर सरकारमधील मंत्री बिस्वजीत सिंह जी, लोसी डिखो जी, लेत्पाओ हाओकिप जी, अवांगबाओ न्यूमाई जी, एस राजेन सिंह जी, वुंगजागिन वाल्ते जी, सिंग जी, सत्यव्रत्य सिंह जी, हे लुखोई सिंह जी , संसदेतील माझे सहकारी, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी आणि मणिपूरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो! खुरुमजरी!

पंतप्रधानांनी मणिपूर मधील इंफाळ येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली

January 04th, 09:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मधील इंफाळ येथे सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या 13 प्रकल्पांचे उद्‌घाटन केले आणि सुमारे 2,950 कोटी रुपयांच्या 9 प्रकल्पांची पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते संबंधी पायाभूत सुविधा, पेयजल पुरवठा, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कला आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत.