अमेरिकेने भारताला 297 प्राचीन कलाकृती परत केल्या

September 22nd, 12:11 pm

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यवहार ब्युरो यांनी उभय देशांमधील घनिष्ठ द्विपक्षीय संबंध कायम राखण्यासाठी आणि उत्तम सांस्कृतिक समज वाढवण्याच्या उद्देशाने जुलै 2024 मध्ये सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली होती. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी अध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली वचनबद्धता पूर्ण करणे हा यामागचा उद्देश असून जून 2023 मधील त्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ते प्रतिबिंबित होते.

पंतप्रधान अमेरिकेतून 157 प्राचीन कलाकृती आणि कलावस्तु मायदेशी आणणार

September 25th, 09:16 pm

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अमेरिकेने 157 कलाकृती आणि पुरातन वस्तू सुपूर्द केल्या. पंतप्रधानांनी अमेरिकेने भारताला पुरातन वस्तू परत दिल्याबद्दल प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती बायडेन यांनी सांस्कृतिक वस्तूंची चोरी , अवैध व्यापार आणि तस्करीचा सामना करण्यासाठी त्यांचे प्रयत्न बळकट करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली.