अनिल माधव दवे यांच्या निधनामुळे पंतप्रधानांना शोक
May 18th, 10:56 am
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे यांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दु:ख झाल्याची शोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.“ माझे स्नेही आणि आदरणीय सहकारी पर्यावरण मंत्री अनिल माधव दवेजी यांच्या आकस्मात निधनामुळे मला खूप मोठा धक्का बसला आहे.पर्यावरण संवर्धनाचे कार्य मोठया धडाडीने करणाऱे अनिल माधव दवेजी “समर्पित लोकसेवक” म्हणून चिरंतन स्मरणात राहतील.काल सायंकाळी उशीरापर्यंत अनिल माधव दवेजी यांच्याशी मी वेगवेगळे विषय, समस्या याबाबत चर्चा केली होती. दवेजी यांच्या निधनामुळे माझे व्यक्तिगत नुकसान झाले आहे.” असे पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.