स्वच्छ भारत मिशनच्या दशकपूर्तीनिमित्त, पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमामध्ये होणार सहभागी

September 30th, 08:59 pm

स्वच्छ भारत मिशन - स्वच्छतेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण जनआंदोलनाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्‍त 2 ऑक्टोबर रोजी, महात्‍मा गांधी यांच्‍या 155 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्‍यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 44 वी ‘प्रगती’ बैठक संपन्न

August 28th, 06:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी मोडल मंचाची 44 वी बैठक झाली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून सक्रीय प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे. तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच बैठक होती.

शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 01st, 10:20 am

तुम्हा सर्वांचे ‘शहरी विकास ' सारख्या महत्वपूर्ण विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये स्वागत आहे.

पंतप्रधानांनी ‘शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित

March 01st, 10:00 am

स्वातंत्र्यानंतर देशात केवळ एक किंवा दोन नियोजित शहरे विकसित झाली आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत भारताची 75 नियोजित शहरे विकसित झाली असती तर जगात भारताची स्थिती पूर्णपणे वेगळी असती, अशी टिप्पणी करत पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. 21व्या शतकातील गतिशील भारतात सुनियोजित शहरे ही काळाची गरज आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. नवीन शहरांचा विकास आणि सध्याच्या शहरांमधील सेवांचे आधुनिकीकरण हे शहरी विकासाचे दोन प्रमुख पैलू असल्याचे सांगत देशाच्या प्रत्येक अर्थसंकल्पात शहरी विकासाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यंदाच्या अर्थसंकल्पात शहरी विकासाच्या मानकांसाठी 15,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे नियोजनबद्ध शहरीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजादी@75 परिषद आणि लखनौमधील एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले भाषण

October 05th, 10:31 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ साथी श्रीयुत राजनाथ सिंह, श्री हरदीप सिंह पुरी, महेंद्र नाथ पांडे, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधील मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रिगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय बंधु भगिनींनो !

पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे लखनऊ येथे उद्‌घाटन

October 05th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन’ या परिषद आणि प्रदर्शनीचे लखनऊ येथे उद्‌घाटन झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, कौशल किशोर, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियान- शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चा प्रारंभ करताना पंतप्रधानांचे संबोधन

October 01st, 11:01 am

नमस्कार ! कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, प्रल्हाद सिंह पटेल जी, कौशल किशोर जी, बिंश्वेश्वर जी, सर्व राज्यांचे उपस्थित मंत्री, नागरी स्थानिक मंडळांचे महापौर आणि अध्यक्ष, महापालिका आयुक्त, स्वच्छ भारत मिशनचे, अमृत योजनेचे सर्व सारथी, पुरुष आणि महिलावर्ग !

पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चे केले उद्घाटन

October 01st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि शहरांचे पुनरुज्जीवन आणि परिवर्तनासाठी अटल मिशन 2.0 चा प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गजेंद्र सिंह शेखावत, प्रल्हाद सिंह पटेल, कौशल किशोर, श्री विश्वेश्वर टुडू, राज्यांचे मंत्री, महापौर आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ भारत योजना- नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा 1 ऑक्टोबरला होणार प्रारंभ

September 30th, 01:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या स्वच्छ भारत मोहिम-शहरे 2 आणि शहरे पुनर्निर्माण व पुनरुज्जीवन यासाठी अटल भारत योजना-नागरी 2.0 याचा आरंभ एक ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे करणार आहेत.