
स्वच्छ भारत मिशनच्या दशकपूर्तीनिमित्त, पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमामध्ये होणार सहभागी
September 30th, 08:59 pm
स्वच्छ भारत मिशन - स्वच्छतेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण जनआंदोलनाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.
मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण
February 11th, 07:35 pm
मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येला मोठा लाभ होणार आहे. या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊन पेयजलाची तरतूद होईल. तसेच मध्य प्रदेशातील रस्ते, रेल्वे, वीज आणि शिक्षण क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी विशेष मागास जमातीतील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा मासिक हप्ता वितरित केला. तसेच स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना 1.75 लाख अधिकार अभिलेखाचे वितरण केले आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 559 गावांना 55.9 कोटी रुपये हस्तांतरित केले.
पंतप्रधान 11 फेब्रुवारीला मध्य प्रदेश दौऱ्यावर
February 09th, 05:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी 2024 रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. दुपारी 12:40 वाजता, ते मध्य प्रदेशात झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.India’s GDP Soars: A Win For PM Modi’s GDP plus Welfare
December 01st, 09:12 pm
Exceeding all expectations and predictions, India's Gross Domestic Product (GDP) has demonstrated a remarkable annual growth of 7.6% in the second quarter of FY2024. Building on a strong first-quarter growth of 7.8%, the second quarter has outperformed projections with a growth rate of 7.6%. A significant contributor to this growth has been the government's capital expenditure, reaching Rs. 4.91 trillion (or $58.98 billion) in the first half of the fiscal year, surpassing the previous year's figure of Rs. 3.43 trillion.नवी दिल्ली येथील पहिल्या अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 30th, 10:01 am
भारताच्या न्यायव्यवस्थेचं नेतृत्व करत असलेल्या आपणा सर्वांमध्ये येणं नेहमीच एक सुखद अनुभव असतो, पण बोलणं जरा कठीण असतं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांच्या अध्यक्षांची ही अशा प्रकारची पहिली राष्ट्रीय बैठक आहे आणि मी असं समजतो की ही एक चांगली, शुभ सुरुवात आहे, म्हणजेच हे यापुढेही सुरु राहील. अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी आपण निवडलेली वेळ अचूक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची देखील आहे. आजपासून थोड्याच दिवसांनी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहे. हा काळ आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत काळाची वेळ आहे. ही वेळ त्या संकल्पांची आहे, जे पुढील 25 वर्षांत देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील. देशाच्या या अमृत यात्रेत, ईझ ऑफ डूइंग बिझनेस (व्यापार सुलभता) आणि ईझ ऑफ लिव्हिंग (जगण्यातील सुलभता) प्रमाणेच ईझ ऑफ जस्टीस (न्याय मिळण्यातील सहजता) देखील तेवढीच महत्वाची आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतील. या कार्यक्रमासाठी मी विशेषतः ललितजी यांचे आणि आपल्या सर्वांचं विशेष अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो.PM addresses inaugural session of First All India District Legal Services Authorities Meet
July 30th, 10:00 am
PM Modi addressed the inaugural session of the First All India District Legal Services Authorities Meet. The Prime Minister said, This is the time of Azadi Ka Amrit Kaal. This is the time for the resolutions that will take the country to new heights in the next 25 years. Like Ease of Doing Business and Ease of Living, Ease of Justice is equally important in this Amrit Yatra of the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजादी@75 परिषद आणि लखनौमधील एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले भाषण
October 05th, 10:31 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ साथी श्रीयुत राजनाथ सिंह, श्री हरदीप सिंह पुरी, महेंद्र नाथ पांडे, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधील मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रिगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय बंधु भगिनींनो !पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे लखनऊ येथे उद्घाटन
October 05th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन’ या परिषद आणि प्रदर्शनीचे लखनऊ येथे उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, कौशल किशोर, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला ‘आझादी@75 – नव नागरी भारत : नागरी परिदृश्य कायापालट’ या परिषद आणि प्रदर्शनाचे करणार उद्घाटन
October 04th, 06:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर 2021 ला सकाळी 10:30 वाजता, उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथल्या ‘आझादी@75 – नव नागरी भारत : नागरी परिदृश्य कायापालट’ या परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.डिजिटल भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 01st, 11:01 am
आजचा दिवस भारताच्या सामर्थ्याला, भारताच्या संकल्पाला आणि भविष्यातल्या अगणित, अमर्याद शक्यतांना समर्पित आहे. एक राष्ट्र म्हणून अवघ्या 5-6 वर्षांमध्ये आपण डिजिटल क्षेत्रामध्ये किती उंच भरारी घेतली आहे, याचे, आजचा दिवस आपल्याला सदैव स्मरण देत राहील.पंतप्रधानांनी ‘डिजिटल भारताच्या’ लाभार्थ्यांशी साधला संवाद
July 01st, 11:00 am
‘डिजिटल भारत’ मोहिमेची सुरुवात झाल्याला सहा वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘डिजिटल भारता’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे हे उपस्थित होते.केरळमध्ये ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील प्रमुख प्रकल्पांच्या उद्घाटन आणि शिलान्यास प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 19th, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पुगलूर- त्रिसूर उर्जा पारेषण प्रकल्प, कासरगोड सौर उर्जा प्रकल्प आणि अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तिरुअनंतपुरम इथल्या एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राची आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राज कुमार सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.केरळमधल्या उर्जा आणि नागरी क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी
February 19th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पुगलूर- त्रिसूर उर्जा पारेषण प्रकल्प, कासरगोड सौर उर्जा प्रकल्प आणि अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तिरुअनंतपुरम इथल्या एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राची आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राज कुमार सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना प्रधानमंत्री यांनी केलेले भाषण
September 15th, 12:01 pm
मित्रांनो, आज ज्या चार योजनांचे उद्घाटन होत आहे, त्यात पाटणा शहरातील बेऊर आणि करमलीचक मध्ये ट्रीटमेंट प्लांट , शिवाय AMRUT योजनेअंतर्गत छपरामधील जल प्रकल्प यांचा समावेश आहे. याशिवाय मुंगेर आणि जमालपुरमधील पाणी समस्येला दूर करू शकणारी जलपूर्ती योजना आणि मुजफ्फरपूरमध्ये नमामि गंगे अंतर्गत नदीकिनारा विकास योजना याचासु्द्धा आज शिलान्यास झाला आहे. शहरातील गरीब वर्ग, शहरात राहणारा मध्यमवर्ग या सर्व मित्र वर्गाचं जीवन सुकर करणाऱ्या या सुविधा मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.पंतप्रधानांनी बिहारमध्ये ‘नमामि गंगे’ योजना आणि ‘अमृत’ योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले
September 15th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 'नमामि गंगे' योजना आणि 'अमृत' योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. आज उद्घाटन झालेल्या चार योजनांमध्ये पाटणा शहरातील बेऊर आणि करम-लेचक येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच सिवान आणि छपरा येथील 'अमृत'' योजनेंतर्गत पाण्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंगेर व जमालपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्प व मुजफ्फरपूरमधील नमामि गंगे अंतर्गत रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट योजनांसाठी आज पायाभरणी करण्यात आली.पंतप्रधान 15 सप्टेंबर रोजी बिहारमधील शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित सात प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार
September 14th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित सात प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार आहेत. यापैकी चार प्रकल्प पाणीपुरवठा, दोन सांडपाणी शुद्धीकरण व एक नदी विकासाशी संबंधित आहेत. या प्रकल्पांचा एकूण खर्च 541 कोटी रुपये आहे. बिहारच्या नगरविकास व गृहनिर्माण विभागांतर्गत या प्रकल्पांची अंमलबजावणी बिडको द्वारे केली जाणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.बिहारमधील बरौनी येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 17th, 12:20 pm
तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी आला आहात यासाठी मी तुमचे नतमस्तक होऊन अभिनंदन करतो. मी पाहतोय की पटणा इथूनही व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक सहभागी झाले आहेत. पटणा आणि हजारीबाग इथे होत असलेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्व लोकांना मी नमस्कार करतो.पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमध्ये 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण
February 17th, 12:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बरौनी येथे बिहारच्या विकासासाठीच्या 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण केले. यावेळी बिहारचे राज्यपाल लालजी टंडन, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधानांनी एका सभेला संबोधित केले.पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
February 15th, 04:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या धुळे आणि यवतमाळला उद्या म्हणजे 16 फेब्रुवारीला भेट देणार आहेत. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.पंतप्रधानांचा सुरत दौरा
January 30th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरतला भेट दिली तसेच सुरत आणि दक्षिण गुजरात विभागाला जोडणाऱ्या सुरत विमानतळ टर्मिनल इमारतीच्या विस्तार प्रकल्पाची कोनशीलाही ठेवली.