भारत आता महामार्ग आणि उच्च तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांमुळे ओळखला जातो: पंतप्रधान मोदी यूपीतील प्रयागराज येथे

May 21st, 04:00 pm

प्रयागराजमध्ये एका मोठ्या सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले, आपल्या सरकारच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकत पूर्वीच्या शासनकाळातील परिस्थिती यांच्यातील तीव्र विरोधाभास विशद केला.

पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे प्रचार सभा

May 21st, 03:43 pm

प्रयागराजमध्ये एका भव्य प्रचार सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले, आपल्या सरकारच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकत पूर्वीच्या शासनकाळातील परिस्थिती यांच्यातील तीव्र विरोधाभास विशद केला.

Except for scams and lawlessness, there is nothing in their report cards: PM Modi in Darbhanga

May 04th, 03:45 pm

Prime Minister Narendra Modi addressed a vibrant gathering in Darbhanga, Bihar, where he paid homage to the late Maharaja Kameshwar Singh Ji and praised the sacred land of Mithila and its people.

PM Modi addresses a public meeting in Darbhanga, Bihar

May 04th, 03:30 pm

Prime Minister Narendra Modi addressed a vibrant gathering in Darbhanga, Bihar, where he paid homage to the late Maharaja Kameshwar Singh Ji and praised the sacred land of Mithila and its people.

बिहारमध्ये औरंगाबाद येथे विविध प्रकल्पांची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 02nd, 03:00 pm

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी तसेच येथे बसलेले सर्व ज्येष्ठ नेते, सर्वांची नावे मी घेत नाही. पण जुन्या सर्व सहकाऱ्यांशी आज भेट झाली आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व मान्यवर येथे आला आहात त्यांचे, जनता जनार्दनाचे मी हार्दिक अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील औरंगाबाद येथे सुमारे 21,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी

March 02nd, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील औरंगाबाद येथे 21,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे आणि नमामि गंगे या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी एका छायाचित्र प्रदर्शनालाही भेट दिली.

रेल्वेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 26th, 01:25 pm

नमस्कार! आजचा हा कार्यक्रम म्हणजे, नवीन भारताच्या नव्या प्रकारच्या कार्य संस्कृतीचे प्रतीक आहे. आज जे काम भारत करीत आहे, ते अभूतपूर्व वेगाने करीत आहे. आज भारत जे काही करतो, त्याचे प्रमाणही अभूतपूर्व असते. आजच्या भारताने लहान-सहान स्वप्ने पाहणे कधीच सोडून दिले आहे. आम्ही मोठी- भव्य स्वप्ने पाहतो आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी रात्रं- दिवस काम करतो. हाच संकल्प या विकसित भारत- विकसित रेल्वे कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातून सहभागी झालेल्या सर्व मंडळीचे मी अभिनंदन करतो. आपल्या बरोबर देशभरातील 500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानके आणि दीड हजारांपेक्षा जास्त इतर स्थानांवरून लक्षावधी लोक जोडले गेले आहेत. वेगवेगळ्या राज्यांचे माननीय राज्यपाल, सर्व मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार मंडळी, आणि स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे, अशी वरिष्ठ मंडळी, भारताचे महत्वपूर्ण लोक, आपल्या आयुष्याची उमेदीची वर्ष, तरूणपणाचा काळ देशासाठी खर्च करणारे आमचे स्वातंत्र्य सेनानी आणि आपली भावी पिढी, युवा सहकारी आज आपल्याबरोबर आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते 41,000 कोटी रुपयांच्या 2000 हून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण

February 26th, 12:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 41,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह देशातील 2000 हून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण झाले. देशभरातील 500 रेल्वे स्थानके आणि 1500 इतर ठिकाणांहून लाखो लोक या विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमाशी जोडले गेले होते.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील पायाभरणी, उद्घाटन आणि विविध प्रकल्पांच्या राष्ट्रार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

February 23rd, 02:45 pm

व्यासपीठावर उपस्थित असलेले उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी महेंद्र नाथ पांडेय जी,उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, बनास दुग्ध संस्थेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी जी, राज्यातील इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि काशीच्या माझ्या कुटुंबातून आलेल्या बंधू-भगिनींनो!

पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी येथे 13,000 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण

February 23rd, 02:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे 13,000 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करून भूमीपूजन केले. पंतप्रधानांनी वाराणसीतील कारखीयांव येथील यूपीएसआयडीए ॲग्रो पार्कमधील बनास काशी संकुल या बनासकांठा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध प्रक्रिया केंद्राला भेट देऊन तेथील गायींच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नियुक्तीपत्रांचे तसेच जीआय-अधिकृत वापरकर्ता प्रमाणपत्रांचे वाटप देखील केले. आज उद्घाटन झालेल्या विकासकामांमध्ये रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पेयजल, शहरी विकास आणि स्वच्छता अशा महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर

February 05th, 05:44 pm

मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी उभा आहे. जेव्हा आदरणीय राष्ट्रपती संसदेच्या या नवीन इमारतीत आम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी आल्या आणि ज्या अभिमानाने आणि आदराने सेंगोल संपूर्ण मिरवणुकीचे नेतृत्व करत होता आणि आपण सर्व त्याच्या पाठी चालत होतो. नवीन सभागृहातील ही नवी परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या पवित्र क्षणाचे प्रतिबिंब बनते तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते. हा 75वा प्रजासत्ताक दिन, त्यानंतरची संसदेची नवीन इमारत, सेंगोलचे नेतृत्व, हा सारे दृश्य अत्यंत प्रभावी होते. जेव्हा मी तिथे संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होत होतो. इथून तर आपल्याला तितकी भव्यता दिसत नाही. परंतु, तिथून जेव्हा मी पाहिले की खरेच या नव्या सभागृहाच्या गौरवशाली उपस्थितीत, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे मान्यवर, तेव्हा ते दृश्य आपल्या सर्वांच्या मनावर ठसले, जे आपल्या कायमचे लक्षात राहील. राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर ज्या 60 हून अधिक सन्माननीय सदस्यांनी आपली मते मांडली. आपले विचार व्यक्त करणाऱ्या आपल्या सर्व सन्माननीय खासदारांचे मी नम्रपणे आभार मानतो. विरोधकांनी घेतलेल्या संकल्पाचे मी विशेष कौतुक करतो. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने माझा आणि देशाचा आत्मविश्वास पक्का केला आहे की त्यांनी दीर्घकाळ तेथे राहण्याचा संकल्प केला आहे.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांचे उत्तर

February 05th, 05:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. अभिभाषणासाठी नवीन संसद भवनात राष्ट्रपती आणि त्यांच्यापाठोपाठ उर्वरित संसद सदस्यांचे आगमन झाल्यावर त्यांना अभिमानाने आणि आदरपूर्वक सभागृहात घेऊन जाताना सेंगोल सर्वात पुढे होते असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ही परंपरा सभागृहाची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढवते असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की 75 वा प्रजासत्ताक दिन, नवीन संसद भवन आणि सेंगोलचे नेतृत्व हे संपूर्ण दृश्य अतिशय प्रभावी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत आपले विचार आणि कल्पना मांडल्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे त्यांनी आभार मानले.

पंतप्रधानांनी केले अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

December 30th, 05:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आणि नव्या अमृत भारत रेल्वे गाड्या आणि वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी इतर अनेक रेल्वे प्रकल्पांचे देखील लोकार्पण केले. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की अयोध्या धाम रेल्वे स्थानक दररोज 10 हजार लोकांची हाताळणी करू शकते आणि त्याचा पुनर्विकास पूर्ण झाल्यावर त्याची क्षमता आता 60,000 पर्यंत पोहोचणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी वंदे भारत आणि नमो भारत या रेल्वेगाड्यांनंतर सुरू होत असलेल्या ‘अमृत भारत’ या नव्या रेल्वे गाड्यांच्या मालिकेबद्दल माहिती दिली आणि आणि पहिली अमृत भारत रेल्वे गाडी अयोध्येमधून जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी उत्तर प्रदेश दिल्ली, बिहार पश्चिम बंगाल आणि कर्नाटकच्या जनतेचे या रेल्वे गाड्या मिळत असल्याबद्दल अभिनंदन केले.

अयोध्यातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 30th, 02:15 pm

अयोध्येच्या सर्व लोकांना माझे नमस्कार. आज सर्व जग उत्सुकतेने 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशावेळी अयोध्यावासीयांमध्ये असलेला हा उत्साह, उत्सुकता अगदी साहजिक आहे. मी भारताच्या मातीच्या कणाकणाचा आणि व्यक्ती व्यक्तीचा पुजारी आहे आणि आपल्या प्रमाणे मीसुद्धा तितकाच उत्सुक आहे. आपल्या सर्वांचा हा उत्साह, ही उत्सुकता थोड्या वेळापूर्वी अयोध्येच्या रस्त्यांवर देखील दिसून येत होती. असं वाटत होतं की संपूर्ण अयोध्या नगरीच रस्त्यावर उतरली आहे. हे प्रेम, हा आशीर्वाद यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय

पंतप्रधानांनी अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

December 30th, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. यामध्ये अयोध्या आणि सभोवतालच्या भागांच्या विकासाच्या 11,100 कोटी रुपये खर्चाच्या आणि उत्तर प्रदेशातील 4,600 कोटी रुपये खर्चाच्या इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर

December 28th, 05:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 11:15 वाजता पंतप्रधान पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. इतर अनेक रेल्वे प्रकल्पही ते देशाला समर्पित करतील. सुमारे 12:15 वाजता पंतप्रधान नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे ते 15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. यामध्ये अयोध्या आणि तिच्या आसपासच्या भागांच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांचे प्रकल्प यांचा समावेश आहे. अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, संपर्क व्यवस्था सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास तसेच वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरात नवीन विमानतळ, नवीन पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन नागरी रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा शुभारंभ होत आहे. यासह, अनेक नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, त्यामुळे अयोध्या आणि आसपासच्या नागरी सुविधांचे सुशोभीकरण आणि सुधारणेला हातभार लागेल.