स्वामी अवधेशानंद आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ह्यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली

May 15th, 04:08 pm

नर्मदा सेवा यात्रा समारोप समारंभात स्वामी अवधेशानंद आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ह्यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली. मोदींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या विकास कार्यामुळे देशाचे रूप पालटेल असे त्यांनी म्हटले.

नर्मदा संवर्धनाचा यज्ञ सुरु झाला आहे: पंतप्रधान मोदी

May 15th, 02:39 pm

अमरकंटक इथे नर्मदा सेवा यात्रा समारोप समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की ही एक विलक्षण जनजागृती चळवळ आहे. नर्मदा संवर्धनाचा यज्ञ सुरु झाला आहे असे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत चळवळीचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की ह्या चळवळीचे यश सरकारच्या प्रयत्नांमुळे नाही तर लोकांच्या प्रयत्नांमुळे मिळाले आहे.

नमामि नर्मदे-नर्मदा सेवा यात्रेचा अमरकंटक येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप पंतप्रधानांनी नर्मदा उगमस्थानी केली प्रार्थना

May 15th, 02:36 pm

नर्मदा सेवा यात्रेच्या समापन समारंभांत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताच्या इतिहासातली ही महत्वपूर्ण जन चळवळ आहे. नर्मदा नदीवर येणारी संकटे ओळखून नदीच्या संवर्धनासाठी आवश्यक कार्य सुरु केल्याबद्दल त्यांनी मध्यप्रदेश सरकारचे अभिनंदन केले. 2022 मध्ये देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत एक नव्या दमाचा विकास घडवून आणण्याचा लोकांनी संकल्प करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

मध्यप्रदेशातील अमरकंटक येथे होणाऱ्या नर्मदा सेवा यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान राहणार उपस्थित

May 14th, 06:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशांत अमरकंटक इथे नर्मदा सेवा यात्रेच्या समापन समारंभांत सहभागी होणार आहेत. नर्मदा सेवा यात्रा ही नर्मदा रक्षणासाठी सुरु केलेली सर्वात उत्तम जनजागृती चळवळ आहे आणि ह्याद्वारे पर्यावरण संरक्षणाचा व्यापक संदेश देखील देण्यात येत आहे.