न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संवाद
July 20th, 02:37 am
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.PM Modi attends News18 Rising Bharat Summit
March 20th, 08:00 pm
Prime Minister Narendra Modi attended and addressed News 18 Rising Bharat Summit. At this time, the heat of the election is at its peak. The dates have been announced. Many people have expressed their opinions in this summit of yours. The atmosphere is set for debate. And this is the beauty of democracy. Election campaigning is in full swing in the country. The government is keeping a report card for its 10-year performance. We are charting the roadmap for the next 25 years. And planning the first 100 days of our third term, said PM Modi.केरळमध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 27th, 12:24 pm
केरळचे राज्यपाल श्री आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, राज्यमंत्री, माझे सहकारी श्री वी. मुरलीधरन जी, इस्रो परिवारातील सर्व सदस्य, यांना माझा नमस्कार!केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) पंतप्रधानांनी दिली भेट
February 27th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळातील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) ला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील एसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी (पीआयएफ); महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा’; आणि तिरुवनंतपुरम येथील व्हीएसएससीमध्ये ‘ट्रायसोनिक विंड टनल’ हे ते तीन प्रकल्प आहेत.फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 14th, 04:31 pm
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानतो.एअर इंडिया-एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून साधला संवाद
February 14th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एच.ई. इमॅन्युएल मॅक्रॉन, रतन टाटा, एमेरिटस, टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा सन्स बोर्डाचे अध्यक्ष, कॅम्पबेल विल्सन, एअर इंडियाचे सीईओ आणि एअरबस चे सीईओ गिलॉम फौरी यांच्याशी, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.कर्नाटक मधील तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे राष्ट्रार्पण आणि तुमकुरू औद्योगिक वसाहतीच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 06th, 04:20 pm
कर्नाटक ही संत, ऋषी-मुनींची भूमी आहे. कर्नाटकने आध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाची महान भारतीय परंपरा नेहमीच बळकट केली आहे. यातही तुमकुरुचे विशेष महत्त्व आहे. सिद्धगंगा मठाची यात खूप मोठी भूमिका आहे. पूज्य शिवकुमार स्वामी जी यांनी घालून दिलेला ‘त्रिविधा दसोही’ म्हणजेच अन्न ,अक्षर आणि आश्रय यांचा वारसा आज सिद्धलिंग महास्वामी जी पुढे नेत आहेत. मी आदरणीय संतांना नमन करतो. गुब्बी स्थित श्री चिदम्बर आश्रम आणि भगवान चन्नबसवेश्वर यांनाही मी वंदन करतो !तुमकुरू येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
February 06th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी तुमकुरू औद्योगिक वसाहत आणि तुमकुरू मधील टिपूर आणि चिक्कनायकनहळ्ळी या दोन ठिकाणी जल जीवन अभियान प्रकल्पांची कोनशीला देखील बसविली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर निर्माण सुविधा आणि स्ट्रक्चर हँगर यांची पाहणी केली तसेच हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे अनावरण केले.Vision of self-reliant India embodies the spirit of global good: PM Modi in Indonesia
November 15th, 04:01 pm
PM Modi interacted with members of Indian diaspora and Friends of India in Bali, Indonesia. He highlighted the close cultural and civilizational linkages between India and Indonesia. He referred to the age old tradition of Bali Jatra” to highlight the enduring cultural and trade connect between the two countries.इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांशी पंतप्रधानांचा संवाद
November 15th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांच्या 800 हून अधिक सदस्यांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. संपूर्ण इंडोनेशियामधून उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशी गर्दी जमली होती.वडोदरा इथे विमान निर्मिती कारखान्याच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 30th, 02:47 pm
भारत जगातले मोठे उत्पादन केंद्र व्हावा या दिशेने आज आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत.भारत आज आपल्या लढाऊ विमानांची निर्मिती करत आहे, भारत आज आपल्या रणगाड्यांची निर्मिती करत आहे,आपल्या पाणबुड्यांची निर्मिती करत आहे.इतकेच नव्हे तर भारतात उत्पादित औषधे आणि लसी आज जगातल्या लाखो लोकांना जीवनदान देत आहेत. भारतात उत्पादित इलेक्ट्रॉनिक उपकरणे,भारतात निर्मिती करण्यात आलेले मोबाईल फोन, भारतात उत्पादित गाड्या आज अनेक देशात लोकप्रिय आहेत. मेक इन इंडिया, मेक फॉर द ग्लोब हा मंत्र घेऊन आगेकूच करणारा भारत आपले सामर्थ्य वृद्धींगत करत आहे. आता भारत वाहतुकीच्या विमानांचाही मोठा निर्माता बनेल.आज भारतात याची सुरवात झाली आहे. मला तो दिवस दिसतो आहे जेव्हा,जगातली मोठी प्रवासी विमानेही भारतात तयार होतील आणि त्यावर लिहिले असेल- मेक इन इंडियाPM lays foundation stone of C-295 Aircraft Manufacturing Facility in Vadodara, Gujarat
October 30th, 02:43 pm
PM Modi laid the foundation stone of the C-295 Aircraft Manufacturing Facility in Vadodara, Gujarat. The Prime Minister remarked, India is moving forward with the mantra of ‘Make in India, Make for the Globe’ and now India is becoming a huge manufacturer of transport aircrafts in the world.सौर आणि अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या चमत्कारांमुळे जग विस्मयचकित: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
October 30th, 11:30 am
आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.पंतप्रधान 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर
October 29th, 08:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुजरात आणि राजस्थान दौ-यावर जाणार आहेत.पंतप्रधानांनी सर्वात अवजड उपग्रह वाहक रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भारतीय अंतराळ संस्था, एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले
October 23rd, 10:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात वजनदार वाहक रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल भारतीय अंतराळ संस्था एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान 3 जून रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
June 02nd, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ येथे पोहोचतील.तिथे ते उत्तरप्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या तिसऱ्या (3.0) पायाभरणी सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 1:45 च्या सुमाराला , पंतप्रधान कानपूरच्या पारौंख गावात पोहोचतील, तिथे ते माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पाथरी माता मंदिराला भेट देतील.त्यानंतर, दुपारी 2 च्या सुमाराला , ते डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला भेट देतील, त्यानंतर 2:15 वाजता मिलन केंद्राला भेट देतील.हे केंद्र माननीय राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे, जे सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आणि त्याचे रूपांतर समुदाय केंद्र (मिलन केंद्र) मध्ये करण्यात आले. त्यानंतर ते दुपारी 2:30 वाजता पारौंख गावात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.