चेन्नईमध्ये अड्यार येथील कर्करोग संस्थेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 12th, 12:18 pm

येत्या १४ तारखेला ‘विलांबी’ या तमीळ नववर्षाची सुरूवात होणार आहे, त्यानिमित्त जगभरातील तमीळ नागरिकांना माझ्या तर्फे सस्नेह शुभेच्छा. अड्यार येथील या कर्करोग संस्थेला भेट देणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. कर्करोग्यांवर उपचार करणारी ही देशातील सर्वात जुनी आणि सर्वात व्यापक अशी महत्वपूर्ण संस्था आहे.