केरळमध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 27th, 12:24 pm
केरळचे राज्यपाल श्री आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, राज्यमंत्री, माझे सहकारी श्री वी. मुरलीधरन जी, इस्रो परिवारातील सर्व सदस्य, यांना माझा नमस्कार!केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) पंतप्रधानांनी दिली भेट
February 27th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळातील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) ला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील एसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी (पीआयएफ); महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा’; आणि तिरुवनंतपुरम येथील व्हीएसएससीमध्ये ‘ट्रायसोनिक विंड टनल’ हे ते तीन प्रकल्प आहेत.अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 22nd, 05:12 pm
आज आपले राम आले आहेत, शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत, शतकांचे अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदाने, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगी, आपल्या सर्वांचे, समस्त देशबांधवांचे खूप खूप अभिनंदन !अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान सहभागी
January 22nd, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यात सहभागी झाले. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींशी मोदी यांनी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक /पोलीस महानिरीक्षकांची बैठक
January 07th, 08:34 pm
यावेळी, नवे फौजदारी कायदे लागू होण्याबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की हे कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारे आहेत. नवे फौजदारी कायदे, ' नागरिक प्रथम , प्रतिष्ठा प्रथम आणि न्याय प्रथम ' या तत्वानुसार तयार करण्यात आले असून ‘दंडा हातात घेऊन काम करण्याऐवजी पोलिसांनी आता ‘डेटा’सोबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांमागचा भाव समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रमुखांना कल्पकतेने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन गुन्हेगारी विषयक कायद्यांतर्गत महिला आणि मुलींना त्यांचे हक्क आणि संरक्षण प्रदान करण्याबाबत पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले. स्त्रिया निर्भयपणे ‘ कुठेही आणि कधीही, , काम करू शकतील हे सुनिश्चीत करून महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी पोलिसांना आवाहन केले.भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
January 06th, 05:15 pm
भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.जम्मू-काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
December 24th, 07:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या आपल्या 7, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी जम्मू-काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. जम्मू-काश्मीरच्या सर्व जिल्ह्यांमधल्या सुमारे 250 विद्यार्थ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या सगळ्यांनी पंतप्रधानांसोबतच्या मनमोकळ्या आणि अनौपचारिक संवादात भाग घेतला.हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 12th, 03:00 pm
भारतमातेचा जयघोष , भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांच्या पराक्रमाचा हा जयघोष , ही ऐतिहासिक भूमी आणि दीपावलीचा हा पवित्र सण. हा अद्भुत संयोग आहे. हा अद्भुत मिलाफ आहे. समाधान आणि आनंदाने भारावून टाकणारा हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठीही आणि देशवासियांसाठीही दिवाळी प्रकाशमय करेल असा मला विश्वास आहे. मी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना सीमेवरून, शेवटच्या गावातून, ज्याला मी आता पहिले गाव म्हणतो, तिथे तैनात आपल्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करत आहे, त्यामुळे सर्व देशवासियांना दिवाळीच्या या शुभेच्छा देखील खूपच खास आहेत. देशवासियांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा.हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे पंतप्रधानांनी शूर जवानांसोबत केली दिवाळी साजरी
November 12th, 02:31 pm
जवानांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, दिवाळीचा सण आणि जवानांच्या शौर्याचे गुणगान यांचा संयोग हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अध्यात्मिक अनुभूतीचा क्षण आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील जवानांसह त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गांव आता देशातील पहिले गाव ठरले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला गगनयान मोहिमेच्या सज्जतेचा आढावा
October 17th, 01:53 pm
भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्यातील प्रयत्नांची रूपरेषा ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 26th, 04:11 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.वंदे भारत एक्सप्रेस प्रकारच्या नऊ गाड्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 24th, 03:53 pm
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विविध राज्यांचे राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, साथी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि माझ्या कुटुंबीयांनो,पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा
September 24th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ह्या वंदे भारत गाड्या म्हणजे, देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारणे आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणे, या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या परिपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आज ज्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले, त्या खालीलप्रमाणे :भारताच्या पहिल्या सौर मोहिम आदित्य -L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे केले अभिनंदन
September 02nd, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची पहिली सौर मोहीम आदित्य- L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.