जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 17th, 11:10 am

तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी 2021 मध्ये जेव्हा आपण भेटलो होतो, तेव्हा कोविड महामारीच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले होते. कुणालाही माहीत नव्हते की कोरोना नंतरचे जग कसे असेल. मात्र आज एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेत संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. आपण सर्वजण जाणतो की जगातील बहुतांश व्यापार सागरी मार्गाने होतो. कोरोना पश्चात काळात आज जगालाही विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळीची गरज आहे. म्हणूनच यंदाची जागतिक भारतीय सागरी परिषद अतिशय महत्वपूर्ण आहे.

जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

October 17th, 10:44 am

तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज मुंबईत झाले. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या 'अमृत काल व्हिजन 2047' चे अनावरणही त्यांनी केले. या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी 'अमृत काल व्हिजन 2047' शी संबंधित 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले. देशाच्या सागरी क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही शिखर परिषद एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

पंतप्रधान 23 ऑक्टोबर रोजी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे लाभार्थी आणि भागधारकांशी साधणार संवाद

October 22nd, 02:39 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून,आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थी आणि भागधारकांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद साधल्यानंतर या कार्यक्रमात ते भाषण करणार आहेत.

भारताच्या निर्मिती क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकारने वाहन निर्मिती आणि ड्रोन उद्योगासाठी उत्पादनसंलग्न प्रोत्साहन योजनेला दिली मंजुरी

September 15th, 04:34 pm

‘आत्मनिर्भर भारत’ साकारण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने वाहन उद्योग आणि ड्रोन उद्योगासाठी 26,058 कोटी रुपये खर्चाच्या, पीआयएल म्हणजेच उत्पादनसंलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. वाहन उद्योगासाठीच्या पीआयएल योजनेमुळे, उच्च मूल्य ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान वाहने आणि उत्पादने यांना प्रोत्साहन मिळणार आहे. उच्च तंत्रज्ञान, अधिक प्रभावी आणि हरित ऑटोमोटिव्ह उत्पादनाचे नवे युग यामुळे सुरु होणार आहे.

मन की बातमध्ये सकारात्मकता आणि संवेदनशीलता, त्याला सामुहिक व्यक्तिमत्वः पंतप्रधान मोदी

July 25th, 09:44 am

दोन दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्रे, काही अविस्मरणीय क्षणांच्या ताज्या आठवणी आताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे, यावेळच्या ‘मन की बात’ ची सुरुवात याच क्षणांनी करुया. टोक्यो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -

भारतीय क्रिकेट संघाने नुकताच मिळवलेला विजय युवकांसाठी प्रेरणादायी

January 22nd, 01:43 pm

आत्मनिर्भर भारताशी निगडीत सर्वात मोठे परिवर्तन अंतःप्रेरणा, कृती आणि प्रतिसाद यामध्ये आहे जे आजच्या युवकांच्या मनोवृत्तीशी साधर्म्य राखणारे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आसाम मधल्या तेजपूर विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत समारंभात दुरदृष्य प्रणालीद्वारे ते आज संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधला, त्यावेळी केलेले भाषण

October 27th, 10:35 am

आत्ता ज्यावेळी मी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी एक अनुभव आला, आज सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर सर्वांना आश्चर्यही वाटत आहे.

PM Modi interacts with beneficiaries of PM SVANidhi Scheme from Uttar Pradesh

October 27th, 10:34 am

PM Narendra Modi interacted with beneficiaries of PM SVANIDHI Yojana from Uttar Pradesh through video conferencing. The Prime Minister said for the first time since independence street vendors are getting unsecured affordable loans. He said the maximum applications of urban street vendors have come from UP.

मध्यप्रदेशातील फेरीवाल्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

September 09th, 11:01 am

केंद्रीय मंत्री परिषदेचे माझे सहकारी हरदीपसिंह पुरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भाई शिवराज, राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य, प्रशासनाशी निगडित लोक, पंतप्रधान स्वनिधी योजनेचे सर्व लाभार्थी आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले मध्य प्रदेश व मध्य प्रदेश बाहेरील माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो.

मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर पंतप्रधानांनी साधला ‘स्वनिधी संवाद’

September 09th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर ‘स्वनिधी संवाद’ साधला. कोविड-19 महामारीमुळे पथ विक्रेत्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे, त्यांना आता पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी सरकारने दि. 1 जून, 2020 रोजी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशातल्या 4.5 लाख पथ विक्रेत्यांनी आपली नावे नोंदविली होती. त्यापैकी 1.4 लाख पथ विक्रेत्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यांना व्यवसायासाठी 140 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.