'तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लोकांचे जीवनमान सुखकर करणे' या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 28th, 10:05 am
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आजच्या अर्थसंकल्पीय वेबिनारचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे. 21व्या शतकातील बदलता भारत, आपल्या नागरिकांचे तंत्रज्ञानाच्या शक्तीने सातत्याने सक्षमीकरण करत आहे. गेल्या काही वर्षांत आमच्या सरकारने प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या मदतीने देशवासियांची जगण्यातील सुलभता वाढविण्यावर भर दिला आहे. या अर्थसंकल्पात देखील तंत्रज्ञान तर आहेच, मात्र त्या सोबतच मानवी भावनांना प्राथमिकता देण्याचा आमचा प्रयत्न आहे.‘तंत्रज्ञानाचा उपयोग करुन राहणीमान सुलभता’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 28th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तंत्रज्ञानाचा उपयोग करून राहणीमान सुलभता’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा भाग आहे. 21व्या शतकातील भारत सातत्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपल्या नागरिकांना सक्षम बनवत आहे असे पंतप्रधानांनी वेबिनारला संबोधित करताना सांगितले. गेल्या काही वर्षांतील प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांचे जीवन सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्शाला प्राधान्य देण्यात आले आहे यावर त्यांनी भर दिला. मागील सरकारांच्या प्राधान्यक्रमातील विरोधाभास पंतप्रधानांनी अधोरेखित केला. त्यांनी आठवण करून दिली की लोकांचा एक विशिष्ट वर्ग नेहमीच लोकांचे भले व्हावे यासाठी सरकारी हस्तक्षेपाची अपेक्षा करत राहिला. मात्र, या सुविधांअभावी त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतीत झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी लोकांचा आणखी एक भाग अधोरेखित केला ज्यांना पुढे जायचे होते परंतु दबाव आणि सरकारी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे ते खालीच ओढले गेले. पंतप्रधानांनी घडलेल्या बदलांची नोंद घेत सांगितले की जीवन सोपे बनवताना आणि राहणीमान सुलभता वाढवताना अत्यंत आवश्यक असलेल्या परिस्थितीत धोरणे आणि त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सरकारी हस्तक्षेप कमी झाला असून नागरिक सरकारला अडथळा मानत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. त्याऐवजी, पंतप्रधान म्हणाले की नागरिक सरकारकडे एक उत्प्रेरक म्हणून पाहत आहेत. इथे तंत्रज्ञानाने खूप मोठी भूमिका बजावली आहे. एक राष्ट्र एक शिधापत्रिकापंतप्रधानांनी गांधीनगर, गुजरात येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 च्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषण
July 04th, 10:57 pm
आजचा हा कार्यक्रम 21 व्या शतकात अधिकाधिक आधुनिक होत असलेल्या भारताची झलक घेऊन आला आहे.संपूर्ण मानवतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती क्रांतिकारी आहे याचे उदाहरण भारताने डिजिटल इंडिया मोहिमेच्या रूपात संपूर्ण जगासमोर ठेवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे गांधीनगर इथे उद्घाटन
July 04th, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर इथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन केले. नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा ही याची संकल्पना आहे. जीवन सुखकर करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सेवा प्रदान करणे अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला. चिप्स टू स्टार्ट अप्स (C2S) कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 30 संस्थांच्या समूहाची पंतप्रधानांनी घोषणा केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, लोकप्रतिनिधी, स्टार्ट अप्सचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातले संबंधित यावेळी उपस्थित होते.दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जागतिक परिस्थिती’ या विषयावरील भाषण
January 17th, 08:31 pm
जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेनिमित्त एकत्र आलेल्या जगभरातील मान्यवरांचे 130 कोटी भारतीयांच्या वतीनं मी स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा भारत कोरोनाच्या आणखी एका लाटेचा जागरूकतेने आणि सावधपणे सामना करत आहे. त्यासोबतच आर्थिक क्षेत्रातील अनेक आशादायी परिणाम मिळवत पुढे वाटचाल करत आहे. भारतात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा उत्साह देखील आहे आणि भारताला आज केवळ एका वर्षात 160 कोटी कोरोना लसी देण्याचा आत्मविश्वास देखील मिळाला आहे.PM Modi's remarks at World Economic Forum, Davos 2022
January 17th, 08:30 pm
PM Modi addressed the World Economic Forum's Davos Agenda via video conferencing. PM Modi said, The entrepreneurship spirit that Indians have, the ability to adopt new technology, can give new energy to each of our global partners. That's why this is the best time to invest in India.शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेच्या 21 व्या शिखर संमेलनातले पंतप्रधानांचे संबोधन
September 17th, 12:22 pm
सर्वप्रथम मी राष्ट्रपती रहमोन यांना एससीओ परिषदेच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा देतो. ताजिक प्रेसिडेंसीने आव्हानपूर्ण जागतिक आणि क्षेत्रीय वातावरणात या संघटनेचं कौशल्याने संचालन केलं आहे. ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 30 व्या वर्षानिमित्ताने, मी संपूर्ण भारतातर्फे सर्व ताजिक बंधू भगीनी आणि राष्ट्रपती रहमोन यांना खूप खूप शुभेच्छा देतो.ई-रुपी डिजिटल पेमेंट सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 02nd, 04:52 pm
या महत्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून सहभागी झालेले सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यांचे मुख्य सचिव, विविध औद्योगिक संस्थांशी संबंधित मित्रगण, स्टार्ट अप फिनटेकशी संबंधित युवा मित्र, बँकांचे वरिष्ठ अधिकारी गण, आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,पंतप्रधानांनी e-RUPI डिजिटल पेमेंट सुविधेचा केला प्रारंभ
August 02nd, 04:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे e-RUPI या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचा प्रारंभ केला. डिजिटल पेमेंटसाठी e-RUPI हे रोकडरहित आणि संपर्क विरहीत साधन आहे.पंतप्रधानांनी दोन्ही सभागृहातील नेत्यांना महामारी विरोधात सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाविषयी अवगत केले
July 20th, 06:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधून भारतातील कोविड -19 ची सद्यस्थिती आणि महामारी विरोधात सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाविषयी अवगत केले.कोविन जागतिक परिषद 2021 मध्ये पंतप्रधानांचे संबोधन
July 05th, 03:08 pm
कोविड-19 विरोधातल्या आपल्या लढ्यात तंत्रज्ञान हा अविभाज्य भाग आहे. सुदैवाने सॉफ्टवेअर हे असे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये संसाधनांची मर्यादा नाही. म्हणूनच तांत्रिक दृष्ट्या साध्य झाल्यावर लगेचच आम्ही कोविड ट्रॅकिंगआणि ट्रेसिंग अॅप ओपन सोर्स केले. सुमारे 200 दशलक्ष वापरर्कर्त्यांसह हे आरोग्य सेतू अॅप, विकासकांसाठी सहज उपलब्ध पॅकेज आहे. भारतात वापर होत असल्याने वेग आणि प्रमाण यासाठी वास्तव जगात याची कसोटी झाली आहे याबाबत आपण निश्चिंत राहा.पंतप्रधानांनी केले कोविन जागतिक परिषदेला संबोधित, कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री असल्याचे प्रतिपादन
July 05th, 03:07 pm
कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे, अश्या शब्दात कोविन मंचाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन जागतिक परिषदेला संबोधित करताना केले.विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण
June 16th, 04:00 pm
या व्यासपीठातून फ्रान्सची तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते. भारत आणि फ्रान्स विविध विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल ही सहकार्याची उदयोन्मुख क्षेत्रे आहेत. हे सहकार्य असेच पुढे वाढत राहणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ आपल्या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला मदत होईल.विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण
June 16th, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात बीजभाषण केले. 2016 पासून दरवर्षी पॅरिसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आणि युरोपमधील सर्वात मोठ्या डिजिटल आणि स्टार्टअप कार्यक्रमांपैकी एक असलेल्या विवा टेक 2021 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून बीजभाषण देण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले होते.महामारीची सद्यस्थिती आणि तिचा सामना करण्यासाठी पुढील योजना आखण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद
August 11th, 02:22 pm
तुम्हा सर्वांशी बोल्ल्यांनंतर प्रत्यक्ष वस्तुस्थितीची अधिक व्यापक माहिती मिळते आणि हे देखील समजते कि आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत. असे नियमितपणे भेटणे, चर्चा करणे आवश्यक देखील आहे कारण जस-जसा कोरोना महामारीचा काळ लोटत आहे, नवनवीन परिस्थिती देखील निर्माण होत आहेत.पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत सद्यस्थितीवर आणि साथीच्या आजारावर उपाययोजना आखण्यासाठी चर्चा केली
August 11th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींशी सद्य परिस्थिती आणि कोविड-19 साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री उपस्थित होतेPrime Minister Narendra Modi chairs review meeting on various development projects in Varanasi
June 19th, 04:01 pm
PM Modi chaired a review meeting through video conferencing on various development projects in Varanasi. The presentation highlighted the progress made in the Kashi Vishwanath Mandir complex by using a drone video of the lay out. The efforts undertaken on effective management of COVID were also discussed.PM's initial remarks in the Virtual Conference with Chief Ministers
June 17th, 04:06 pm
PM Modi interacted with state Chief Ministers on ways to check the spread of coronavirus during ‘unlock 1.0’. He noted that the number of patients who have recovered from COVID-19 till now is more than the number of active cases in the country.PM holds second part of interaction with CMs to discuss situation post Unlock 1.0
June 17th, 04:00 pm
PM Modi interacted with state Chief Ministers on ways to check the spread of coronavirus during ‘unlock 1.0’. He noted that the number of patients who have recovered from COVID-19 till now is more than the number of active cases in the country.PM interacts with CMs to plan ahead for tackling COVID-19
April 27th, 01:54 pm
Prime Minister Shri Narendra Modi today interacted with Chief Ministers of states via video conferencing to discuss the emerging situation and plan ahead for tackling the COVID-19 pandemic. This was the fourth such interaction of the Prime Minister with the Chief Ministers, the earlier ones had been held on 20th March, 2nd April and 11th April, 2020.