"सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा" या विषयावरील जी 20 सत्रात पंतप्रधानांचे भाषण
November 18th, 08:00 pm
सुरुवातीलाच, जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल तसेच यशस्वी जी 20 अध्यक्षतेसाठी अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन करू इच्छितो.सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
November 18th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा’ या विषयावरील जी 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला आज संबोधित केले. शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष महामहिम लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. शाश्वत विकास उद्दिष्टांवर केंद्रित ब्राझीलच्या जी 20 कार्यक्रम पत्रिकेचे त्यांनी कौतुक केले. हा दृष्टिकोन ग्लोबल साऊथच्या समस्या अधोरेखित करतो तसेच नवी दिल्ली जी 20 शिखर परिषदेचे लोककेंद्रित निर्णय पुढे नेतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य साठी भारतीय जी 20 अध्यक्षतेने दिलेला नारा रिओ चर्चेत देखील गुंजत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 18th, 03:20 pm
देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण
February 11th, 07:35 pm
मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येला मोठा लाभ होणार आहे. या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊन पेयजलाची तरतूद होईल. तसेच मध्य प्रदेशातील रस्ते, रेल्वे, वीज आणि शिक्षण क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी विशेष मागास जमातीतील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा मासिक हप्ता वितरित केला. तसेच स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना 1.75 लाख अधिकार अभिलेखाचे वितरण केले आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 559 गावांना 55.9 कोटी रुपये हस्तांतरित केले.२ कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट; महिला स्वयंसहायता गटांमार्फत ड्रोन की उडान उपक्रम राबवणार : पंतप्रधान
August 15th, 01:33 pm
सरकार गावागावात २ कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांसोबत काम करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७६ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सांगितलं. आज देशातील १० कोटी महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. आज खेड्यापाड्यात, बँकेत, अंगणवाडीत आणि औषध देण्यासाठीही दीदी उपलब्ध आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यासाठी एक व्यासपीठ तयार केल्याचं पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की 15,000 महिला स्वयं-सहायता गटांना कर्ज आणि ड्रोन चालविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. ड्रोन की उडान उपक्रम महिला स्वयं-सहायता गटांद्वारे राबवला जाईल, असं पंतप्रधान म्हणाले.PM Modi attends a mass wedding ceremony – 'Papa Ni Pari' Lagnotsav 2022, at Bhavnagar, Gujarat
November 06th, 05:32 pm
Prime Minister Narendra Modi today attended a mass wedding ceremony – 'Papa Ni Pari' Lagnotsav 2022, at Bhavnagar, Gujarat. PM Modi spoke at the event and addressed the audience by giving his blessing to all 552 daughters getting married at the event. PM Modi, furthermore, highlighted the importance of having a father in one’s life.पंतप्रधान 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला देणार भेट
April 16th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.जल जीवन अभियान देशाच्या विकासाला नवी प्रेरणा देत आहे – पंतप्रधान
April 09th, 09:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की जल जीवन अभियानाने आज देशाच्या विकासाला नवी प्रेरणा मिळत आहे. गेल्या 3 वर्षांहून कमी कालावधीत करोडो घरांपर्यंत पाणीपुरवठा पोहोचविण्यात आले असून हे अभियान म्हणजे जनतेच्या आकांक्षा आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे असे देखील त्यांनी सांगितले.आरोग्य क्षेत्रावर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा सकारात्मक परिणाम या वरच्या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 26th, 02:08 pm
मंत्रिमंडळातले माझे सहकारी, देशभरातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक, आरोग्य व्यवस्थापक, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडले गेलेले महनीय, महिला आणि सज्जन हो!पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन
February 26th, 09:35 am
पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.Double engine government in Punjab will ensure development, put an end to mafias: PM Modi
February 17th, 11:59 am
Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a rally in Punjab’s Fazilka. Addressing the huge rally, he said, “Today Punjab needs a government that draws inspiration from patriotism, from the development of Punjab. BJP has come before you with dedication, with the resolve of security and development of Punjab.”PM Modi addresses a Vishal Jan Sabha in Punjab’s Fazilka
February 17th, 11:54 am
Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a rally in Punjab’s Fazilka. Addressing the huge rally, he said, “Today Punjab needs a government that draws inspiration from patriotism, from the development of Punjab. BJP has come before you with dedication, with the resolve of security and development of Punjab.”केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 संदर्भात पंतप्रधानांचे भाषण
February 01st, 02:23 pm
हा अर्थसंकल्प 100 वर्षातून एकदा उद्भवणाऱ्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळ देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक नव्या संधी निर्माण करेल. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत विकास, अधिक गुंतवणूक आणि अधिक रोजगाराच्या नव्या संधींनी युक्त अर्थसंकल्प आहे. आणखी एक नवीन क्षेत्र खुले झाले आहे, आणि ते आहे हरित रोजगाराचे. हा अर्थसंकल्प तत्कालीन गरजा देखील पूर्ण करतो आणि देशातील युवकांचे उज्ज्वल भविष्य देखील सुनिश्चित करतो.“लोकांसाठीच्या आणि प्रगतीशील अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधानांनी केले अर्थमंत्र्यांचे अभिनंदन”
February 01st, 02:22 pm
शतकातून एकदाच येणाऱ्या नैसर्गीक संकटकाळातही या वर्षीचा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेउन आला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला समर्थ बनवेल व सामान्यांसाठी नव्या संधींचेही निर्माण करेल. असे त्यांनी म्हटले आहे.‘कस्टमाईज क्रॅश कोर्स प्रोग्रॅम फॉर कोविड 19 फ्रंटलाईन वर्कर्स’ कार्यक्रमाचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 18th, 09:45 am
कोरोनाच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या महायुद्धामध्ये आज एका महत्वपूपर्ण मोहिमेचा पुढचा टप्पा प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी देशामध्ये हजारो व्यावसायिक, कौशल्य विकास मोहिमेशी जोडले गेले. अशा प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे देशाला कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी खूप मोठी शक्ती मिळाली. आता कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे वारंवार बदलणारे स्वरूप आपल्यासमोर नवनवीन आव्हाने कशा पद्धतीने निर्माण करीत आहे, हे तुम्ही लोकांनी पाहिले आहे.कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा पंतप्रधानांनी केला आरंभ
June 18th, 09:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा आज दुरदृष्य प्रणालीद्वारे आरंभ केला. 26 राज्यात 111प्रशिक्षण केंद्रांवर हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. या उपक्रमांतर्गत एक लाख फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या सह इतर केंद्रीय मंत्री, राज्यांचे मंत्री, तज्ञ आणि इतर संबंधित यावेळी उपस्थित होते.कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
May 15th, 02:42 pm
देशातील कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. देशातील कोविडशी संबंधित सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधनPM to release commemorative coin of Rs 75 denomination to mark the 75th Anniversary of FAO
October 14th, 11:59 am
On the occasion of 75th Anniversary of Food and Agriculture Organization (FAO) on 16th October 2020, Prime Minister Shri Narendra Modi will release a commemorative coin of Rs 75 denomination to mark the long-standing relation of India with FAO. Prime Minister will also dedicate to the Nation 17 recently developed biofortified varieties of 8 crops.मध्यप्रदेशात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत बांधल्या गेलेल्या 1.75 लाख घरांच्या ‘गृह प्रवेशम’ समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 12th, 11:01 am
आता थोड्यावेळापूर्वी माझी काही लाभार्थ्यांशी चर्चा झाली, ज्यांना आज पक्के घर मिळाले आहे, आपल्या मुलांच्या भविष्याचा विश्वास मिळाला आहे. आता मध्यप्रदेशातील ही पावणे दोन लाख कुटुंबे आता आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करणार आहेत. मी त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो. हे सर्वजण, तंत्रज्ञानाच्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, पूर्ण मध्यप्रदेशातून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज तुम्ही देशातल्या त्या सव्वा कोटी कुटुंबांत सहभागी झाले आहात, ज्यांना गेल्या सहा वर्षात आपले घर मिळाले आहे. जे आता भाड्याच्या घरात नाही, झोपडपट्टीत नाही, कच्च्या घरांमध्ये नाही, तर आपल्या घरात राहत आहेत. आपल्या पक्क्या घरांमध्ये राहत आहेत.