संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.सार्वजनिक सेवा प्रसारणासाठी मोठी चालना: वर्ष 2025-26 पर्यंत 2,539.61 कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय क्षेत्राच्या ‘प्रसारण पायाभूतसुविधा आणि नेटवर्क विकास (BIND)’ योजनेला आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीची मंजुरी
January 04th, 04:22 pm
प्रसार भारती म्हणजेच आकाशवाणी (AIR) आणि दूरदर्शनच्या (DD) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2,539.61 कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय क्षेत्र योजना “प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास” (BIND) च्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. मंत्रालयाची प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास ही योजना प्रसार भारतीला तिच्या प्रसारण पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि अद्ययावत करण्यासाठी, आशयसामग्री विकासासाठी आणि संस्थेशी संबंधित नागरी कार्याशी संबंधित खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे साधन आहे.महाकठीण काम देखील शांत आणि स्थिर मनाने पूर्ण केले जाऊ शकते : मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी
July 29th, 11:30 am
मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी निसर्गाचे रक्षण, आणि निसर्गाचे संवर्धन करण्याविषयी बोलले. थायलंडमधल्या किशोरवयीन फुटबॉलपटुंच्या संघाच्या बचावासाठी करण्यात आलेल्या यशस्वी मोहिमेचा उल्लेख करून ते म्हणाले की महाकठीण काम देखील शांत आणि स्थिर मनाने पूर्ण केले जाऊ शकते. विविध क्रीडा प्रकारात खेळाडूंनी जागतिक स्तरावर केलेल्या उत्तम कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना श्रद्धांजली अर्पण केली.पंतप्रधान उद्या देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार
June 19th, 07:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडे नऊ वाजता व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे म्हणणे थेट ऐकण्याची संधी मिळणार आहे.