राउरकेला येथील आदि महोत्सवा संदर्भातले संदेश पंतप्रधानांनी केले सामायिक

April 08th, 11:33 am

आपल्या आदिवासी समुदायांचा वारसा आणि संस्कृती हा भारताचा गौरव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी 'आदी महोत्सवा' बाबत व्यापक रुचीबद्दल आनंद व्यक्त केला.

February 23rd, 09:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आदी महोत्सवा' बाबत व्यापक रुचीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. लोकसभेचे खासदार डॉ. भोला सिंह यांनी 'आदी महोत्सव' ला भेट दिल्यानंतर त्याबद्दलची माहिती ट्विट केली आहे, त्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे. या महोत्सवाचे आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले असून तिथे तुम्हाला संपूर्ण भारतातील आदिवासी संस्कृतीविषयी अप्रतिम सादरीकरण पाहायला मिळेल, असे सिंह यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर "आदि महोत्सवा"त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 16th, 10:31 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, फग्गन सिंह कुलस्ते जी, रेणुका सिंह जी, डॉक्टर भारती पवार जी, बिशेश्वर टुडू जी, इतर मान्यवर आणि देशाच्या विविध राज्यातून आलेले माझे सगळे आदिवासी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आदि महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

पंतप्रधानांनी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्‍ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सवाचे केले उद्‌घाटन

February 16th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील मेजर ध्यानचंद रा‍ष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा- महोत्सवाचे उद्‌घाटन केले. आदि महोत्सव हा राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न आहे. या महोत्सवामध्‍ये आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपरिक कला यांचे सादरीकरण केले आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड (टीआरआयएफईडी – ट्रायफेड) चा हा वार्षिक उपक्रम आहे.

पंतप्रधान दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्‍ट्रीय क्रीडा मैदानावर 16 फेब्रुवारी रोजी आदि महोत्सवाचे करणार उद्घाटन

February 15th, 08:51 am

देशातील आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी पावले उचलण्यात पंतप्रधान अग्रभागी आहेत, त्याचबरोबर देशाच्या वृद्धी आणि विकासामध्‍ये आदिवासींनी दिलेल्या योगदानाचा आदर पंतप्रधानांकडून केला जातो. राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, दि. 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्‍ट्रीय क्रीडा मैदानावर सकाळी 10:30 वाजता आदी महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा-महोत्सवाचे उद्घाटन करण्‍यात येणार आहे.