पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संयुक्तपणे केले मॉरिशसमधील सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्‌घाटन तसेच नागरी सेवा महाविद्यालय आणि 8 मेगावॉटचा सौर ऊर्जा फोटो वोल्टाइक प्रकल्प यासाठी केले भूमिपूजन

January 20th, 06:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी आज संयुक्तपणे मॉरिशसमधील सामाजिक गृहनिर्माण एकक प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या गतिमान विकासात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यावेळी, उभय देशांच्या पंतप्रधानांनी आणखी दोन प्रकल्पांसाठीच्या भूमिपूजन समारंभातही आभासी माध्यमातून भाग घेतला. यामध्ये एका अद्ययावत अशा नागरी सेवा महाविद्यालयाचा आणि 8 मेगावॉटच्या सौर ऊर्जा फोटो वोल्टाइक प्रकल्पाचा समावेश आहे. मॉरिशसच्या विकासासाठी भारताकडून मिळणाऱ्या पाठबळातून हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. मॉरिशसमध्ये त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाच्या परिसरात त्यांचे काही कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मॉरिशसमधील विकास प्रकल्पांच्या संयुक्त उद्‌घाटन आणि प्रारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 20th, 04:49 pm

सर्व 130 कोटी भारतवासीयांच्या वतीने मॉरिशसच्या सर्व बंधुभगिनींना नमस्कार, बॉन्झो (फ्रेंच भाषेतून नमस्ते) आणि थाइपूसम कावडीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !