सोशल मीडिया कॉर्नर 21 जून 2018

June 21st, 08:04 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरांत उत्साहांत साजरा

June 21st, 03:04 pm

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जगभरात प्रचंड उत्साह दिसून आला. योगशास्त्राचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि तो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा यासाठी जगभरात मोठ्या संख्येने योग प्रशिक्षण शिबिरे, सत्रे आणि परिषदांचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, मुख्यमंत्री यांनी योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले

June 21st, 01:25 pm

माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान, केंद्र सरकारचे मंत्री आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि योग प्रदर्शनांत सहभाग घेतला.

डेहराडून येथे 21-06-2018 रोजी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 21st, 07:10 am

या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि अतिशय सुंदर अशा या मैदानावर उपस्थित असलेले माझे सर्व मित्र तसेच जगभरातील सर्व योगप्रेमी यांना मी उत्तराखंड देवभूमीच्या पवित्र स्थानावरून चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो. योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्व जण माता गंगेच्या या भूमीवर उपस्थित राहिलो आहोत हे आपल्या सर्वांचे मोठे भाग्य आहे कारण या ठिकाणी चार पवित्र तीर्थस्थाने वसली आहेत, हे तेच स्थान आहे ज्या स्थानाला आदि शंकराचार्यांनी भेट दिली आणि स्वामी विवेकानंद अनेकदा या ठिकाणी येऊन गेले.

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचे संबोधन

June 21st, 07:05 am

योगाभ्यास हा जगातील सर्वात शक्तीशाली आणि एकजूटीचे साधन, दल बनले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडमधील देहराडून येथे वन संशोधन संस्थेच्या संकुलात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी पंतप्रधानांनी सुमारे 50 हजार उत्साही योगाभ्यास स्वयंसेवकांसह वन संशोधन संस्थेच्या आवारात योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली.

देहरादून मध्ये होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान करणार

June 20th, 01:24 pm

देहरादूनमध्ये 21 जून 2018 रोजी होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

योग हा ‘मी’ कडून ‘आम्ही’ कडे जाण्याचा प्रवास आहे : पंतप्रधान मोदी

June 18th, 08:47 pm

ट्वीटरवर दिलेल्या व्हिडिओ संदेशांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, “आम्ही लवकरच चौथा योग दिन साजरा करणार आहोत, जगभरातल्या लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी योगाला आपल्या जीवनाचा भाग बनवावे. योग केवळ व्यायामाचा प्रकार नसून तो आरोग्यासाठी हमी देणारा पासपोर्ट आहे. योग ही एक लोक चळवळ करण्याचे मी आवाहन करतो.”