गोव्यामधील विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 06th, 02:38 pm
गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले जी, येथील तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीगण, इतर मान्यवर आणि गोव्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.समस्त गोंयकारांक, मना-कालझा सावन नमस्कार। तुमचो मोग अनी उर्बा पूड़ोंन, म्हाका गोयांत योन सदांच खोस सता।पंतप्रधानांनी गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 "या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 06th, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. आज पायाभरणी तसेच उद्घाटन झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये शिक्षण, क्रीडा, जलसंस्करण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणे आदींचा समावेश आहे. पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 1930 सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही वितरित केले. विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी मंजुरी पत्रेही सुपूर्द केली.गोव्यामधील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 26th, 10:59 pm
व्यासपीठावर उपस्थित इतर लोकप्रतिनिधी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष भगिनी पीटी उषा जी, देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले माझे सर्व खेळाडू मित्र, मदतनीस कर्मचारी, इतर पदाधिकारी आणि युवा मित्रांनो, भारतीय क्रीडा महाकुंभाचा प्रवास आज गोव्यात येऊन पोहोचला आहे. सगळीकडे रंग आहे...तरंग आहेत...रोमांच आहे..उत्साह आहे. गोव्याच्या हवेत असेच काहीसे आहे. आपणा सर्वांना सदतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!पंतप्रधानांनी गोव्यामध्ये केले 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
October 26th, 05:48 pm
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गोव्यामध्ये भारतीय खेळांच्या महाकुंभाचा प्रवास सुरू झाला आहे आणि संपूर्ण वातावरण विविध रंग, लहरी, उत्साह आणि साहसाने भरून गेले आहे. गोव्याच्या तेजोवलयासारखे दुसरे काहीच असू शकत नाही असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी गोव्याच्या जनतेचे अभिनंदन केले आणि 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये गोव्याचे योगदान अधोरेखित केले आणि गोव्याच्या फुटबॉल प्रेमाचा दाखला दिला. क्रीडाप्रेमी गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हीच मुळी एक उत्साहाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला देणार भेट
October 25th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबर, 2023 रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान सुमारे एक वाजता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उदघाटन देखील होणार आहे. सुमारे दोन वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जल पूजन करून या धरणाच्या डाव्या कालव्याची यंत्रणा राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर सुमारे सव्वा तीन वाजता पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक सभेला उपस्थित राहणार असून आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू अशा बहुविध क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उदघाटन करणार आहेत.