PM Modi's Interview with KUNA
December 21st, 09:55 pm
In an interview with KUNA, Prime Minister Narendra Modi emphasised India's growing global influence. During his Kuwait visit, he highlighted trade, energy partnerships, soft power and economic growth. He advocated bilateral cooperation, global sustainability and India's role as a voice for the Global South.पंतप्रधान मोदींची हिंदुस्थानला मुलाखत
May 31st, 08:00 am
'हिंदुस्थान'ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी सध्या होत असलेल्या निवडणुकांसह इतर अनेक विषयांवर भाष्य केले. देशातील जनता नकारात्मक राजकारणावर करणाऱ्या पक्षांना नाकारत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले. आजच्या मतदाराला एकविसाव्या शतकातील राजकारण पहायचे आहे. 'एक देश, एक निवडणूक' या मुद्द्यावर बोलताना या मुद्द्यावर सहमतीने पुढील निर्णय घेतला जावा असे आपले मत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान मोदींची ओपन मॅगझिनला मुलाखत
May 29th, 05:03 pm
ओपन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या सरकारने केलेली कामगिरी, भारताच्या भविष्याविषयीचे आपले व्हिजन, देशात स्थिर सरकार असण्याची गरज यासह इतर अनेक मुद्द्यांची चर्चा केली.पंतप्रधान मोदींची रिपब्लिक बांग्लाच्या मयूख रंजन घोष यांना मुलाखत
May 28th, 09:50 pm
रिपब्लिक बांग्लाच्या मयूख रंजन घोष यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी अनेक विषयांवर बोलले.पंतप्रधान मोदींची CNN News18 च्या पल्लवी घोष यांना मुलाखत
May 28th, 09:15 pm
CNN News18 ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केले.पंतप्रधान मोदींची एबीपी न्यूजला मुलाखत
May 28th, 09:03 pm
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांविषयी चर्चा केली तसेच भाजप प्रणित एनडीए धोरणावर आधारित शासन आणि विकासाप्रती वचनबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या संधिसाधू आणि लांगूलचालनाच्या राजकारणावरही त्यांनी प्रकाश टाकला. याशिवाय, बंगालचा आणि रामकृष्ण मिशनचा आपल्या आयुष्याच्या आणि मूल्यांच्या जडणघडणीत खोलवर प्रभाव असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.पंतप्रधान मोदींची न्यूज नेशनला मुलाखत
May 28th, 08:39 pm
न्यूज नेशनला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए विकासासाठी वचनबद्ध असल्यावर प्रकर्षाने भर देत सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली. INDI आघाडीत जातीयवाद आणि घराणेशाही पुरेपूर भरलेली असल्याची टीका त्यांनी केली.पंतप्रधान मोदींची 'अजित समाचार'ला मुलाखत
May 28th, 11:59 am
'अजित समाचार'ला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. 4 जून रोजी एनडीए आघाडी ऐतिहासिक बहुमत मिळवेल, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाने एनडीएला तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्याचे ठरविले आहे. पंजाबमधील भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, सरकारच्या पुढील कार्यकाळात पंजाबला अधिक मजबूत, सुरक्षित, आणखी समृद्ध आणि सर्वार्थाने चांगले बनवण्याचे प्रयत्न केले जातील.पंतप्रधान मोदींची ANI न्यूजला मुलाखत
May 28th, 10:00 am
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकींबाबत विस्तृत चर्चा केली. विरोधक धर्मावर आधारित आरक्षणाला प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी त्यांच्यावर टीका केली तसेच काही प्रभावशाली कुटुंबांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर करून घेतला यावरही प्रकाश टाकला. याशिवाय, पंतप्रधानांनी ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी भाजपने विकासाचा अजेंडा ठरवला असल्याचेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.पंतप्रधान मोदींची IANS ला मुलाखत
May 27th, 02:51 pm
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IANS ला दिलेल्या मुलाखतीत सरकारची भ्रष्टाचाराबाबतची भूमिका, धोरणानुसार शासन चालवण्याबद्दलची बांधिलकी यांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या दृष्टिकोनामुळे शासनाचा कारभार भ्रष्टाचारमुक्त, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्ष होईल याची शाश्वती असल्याचे त्यांनी स्पष्ट करत सरकारी योजनांची पुरेपूर अंमलबजावणी करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.