सरकार गावागावात २ कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांसोबत काम करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७६ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सांगितलं. आज देशातील १० कोटी महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. "आज खेड्यापाड्यात, बँकेत, अंगणवाडीत आणि औषध देण्यासाठीही दीदी उपलब्ध आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यासाठी एक व्यासपीठ तयार केल्याचं पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की 15,000 महिला स्वयं-सहायता गटांना कर्ज आणि ड्रोन चालविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. "ड्रोन की उडान" उपक्रम महिला स्वयं-सहायता गटांद्वारे राबवला जाईल, असं पंतप्रधान म्हणाले.