पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम कौतुक करण्याबरोबरच त्यांच्याकडून सतत मिळालेल्या पाठिंब्यामुळे तिला देशासाठी आणखी काही करण्याची प्रेरणा कशी मिळाली याची आठवण पीव्ही सिंधूने एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी आणि नंतर, तसेच पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला तेव्हा पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीविषयी सांगताना त्या सर्व भेटी 'अत्यंत संस्मरणीय' असल्याचे तिने म्हटले आहे.
सिंधू म्हणते की “तू देशासाठी खरोखर चांगली कामगिरी केली आहेस” असे पंतप्रधान मोदींनी माझे अभिनंदन केले ती, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. ती पुढे म्हणते की खेळाडूंनी पदके मिळवली, तेव्हा पंतप्रधानांकडून मिळालेल्या शाबासकीने सर्वांनाच आनंद झाला होता. पंतप्रधान मोदींनी तरुणांना प्रोत्साहन देण्याचे सर्व खेळाडूंना आवाहन केले होते, त्या प्रसंगाचीही आठवण तिने सांगितली आहे..
ती म्हणाली, “पंतप्रधान मोदी हे केवळ एक नेतेच नाहीत तर बरेच काही आहेत. त्यांचे खेळाबद्दलचे व्हिजन हे एक उत्तम उदाहरण आहे. ते ज्या पद्धतीने ते सांगतात किंवा म्हणतात… आपण ते नक्की करू, आपण ते करू शकतो… प्रोत्साहन देणे आणि काहीतरी शिकवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी त्यांनी सर्व खेळाडूंशी ऑनलाइन बातचीत केली होती. त्यांच्या शब्दांनी आम्हाला खूप आत्मविश्वास आला आणि प्रोत्साहनही मिळाले. त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला प्रोत्साहन दिले ते खूप महत्त्वाचे आहे कारण एखाद्या स्पर्धेला जाण्यापूर्वी असे प्रोत्साहनपर शब्द ऐकायला मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे.”
#ModiStory
— Modi Story (@themodistory) March 27, 2022
"Not just another leader!"
This is what @pvsindhu1 had to say about PM Narendra Modi. She talks about how the constant support & appreciation from PM inspires her for doing more.
Congratulations to #PVSindhu on winning #SwissOpen2022.https://t.co/9iulCarBhp pic.twitter.com/VBeKFuVKqF
डिस्क्लेमरः
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांनी सांगितलेले किस्से/मत/विश्लेषण आणि त्यांचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम सांगणाऱ्या आठवणी संकलित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.