भारताला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. हे असंख्य लोक भारताला स्वच्छ राखण्याचे काम करत आहेत.

24 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला दिलेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला कायम स्मरणात राहील असे काम केले.

पंतप्रधानांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे पाय धुतले.

यावरून सफाई कर्मचाऱ्यांबद्दल पंतप्रधानांच्या मनात असेल परम आदर दिसून येतो. यावरून हे दिसते की पंतप्रधान प्रत्येक भारतीयाची काळजी करतात, प्रत्येकाच्या कामाचे मोल जाणतात. ते भारतीयांच्या बरोबर खांद्याला खांदा भिडवून नेहमी उभे राहतील हेच यावरून स्पष्ट होते.

देश स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान विस्तृतपणे बोलले. 2019 च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची आणि स्वच्छतेची त्यांनी विशेष प्रशंसा केली.

स्वच्छ भारत मिशन एक शक्तिशाली लोक चळवळ बनली आहेजी समाजातील सर्व क्षेत्राच्या सक्रिय सहभागाने मजबूत झाली आहे. 2014 मध्ये स्वच्छतेचे प्रमाण 38% होते ते 2019 मध्ये 98% पर्यंत वाढले आहे. देशभरात स्वच्छता वाढविण्यासाठी लोक प्रचंड संख्येने मोहिम चालवतात. देश स्वच्छ करण्यासाठी युवावर्गाने सक्रिय सहकार्य केले आहे.

पंतप्रधानांचा, सफाईकर्मचाऱ्यांचे पाय धुतानाचा हा व्हिडिओ आपल्यालाही स्तिमित करेल.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .