भारताला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. हे असंख्य लोक भारताला स्वच्छ राखण्याचे काम करत आहेत.
24 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला दिलेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला कायम स्मरणात राहील असे काम केले.
पंतप्रधानांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे पाय धुतले.
यावरून सफाई कर्मचाऱ्यांबद्दल पंतप्रधानांच्या मनात असेल परम आदर दिसून येतो. यावरून हे दिसते की पंतप्रधान प्रत्येक भारतीयाची काळजी करतात, प्रत्येकाच्या कामाचे मोल जाणतात. ते भारतीयांच्या बरोबर खांद्याला खांदा भिडवून नेहमी उभे राहतील हेच यावरून स्पष्ट होते.
देश स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान विस्तृतपणे बोलले. 2019 च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची आणि स्वच्छतेची त्यांनी विशेष प्रशंसा केली.
स्वच्छ भारत मिशन एक शक्तिशाली लोक चळवळ बनली आहे, जी समाजातील सर्व क्षेत्राच्या सक्रिय सहभागाने मजबूत झाली आहे. 2014 मध्ये स्वच्छतेचे प्रमाण 38% होते ते 2019 मध्ये 98% पर्यंत वाढले आहे. देशभरात स्वच्छता वाढविण्यासाठी लोक प्रचंड संख्येने मोहिम चालवतात. देश स्वच्छ करण्यासाठी युवावर्गाने सक्रिय सहकार्य केले आहे.
पंतप्रधानांचा, सफाईकर्मचाऱ्यांचे पाय धुतानाचा हा व्हिडिओ आपल्यालाही स्तिमित करेल.